Saturday, November 23, 2024
Homeनगरमनपा भरती प्रक्रियेला वेग

मनपा भरती प्रक्रियेला वेग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच महापालिकेच्या रखडलेल्या कर्मचारी भरती प्रक्रियेला वेग आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस मार्फत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. महापालिकेकडून परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम त्यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचारी भरती संदर्भातील प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

महापालिकेतील मंजूर असलेल्या दोन हजार 871 पदांपैकी दीड हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. जून महिन्यात आणखी काही कर्मचारी निवृत्त होणार आहेत. तांत्रिक कर्मचार्‍यांची कमतरता असल्यामुळे कामकाजात अडथळे येत आहेत. त्यामुळे महापालिकेने राज्य शासनाकडे कर्मचारी भरतीबाबत प्रस्ताव पाठवला होता. राज्य शासनाने महानगरपालिकेतील रिक्त पदांपैकी 134 तांत्रिक पदे भरण्यासाठी मान्यता दिलेली आहे. याबाबतची सर्व माहिती महापालिकेकडून टाटा कन्सल्टन्सीला देण्यात आलेली आहे.

कर्मचारी भरती प्रक्रियेअंतर्गत होणार्‍या परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असावा, याची सविस्तर माहितीही महापालिकेकडून देण्यात आली आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया रखडली होती. मात्र आता आचारसहिता संपताच या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात महापालिकेतील तांत्रिक कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या