Tuesday, December 10, 2024
Homeनगरसर्व दुकाने व आस्थापनांनी मराठी भाषेत फलक लावावे

सर्व दुकाने व आस्थापनांनी मराठी भाषेत फलक लावावे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शासनाच्या सूचनेनुसार नगर महापालिका (Ahmednagar Municipal Corporation) क्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत (Marathi Language) लावण्यात यावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त शंकर गोरे (Commissioner Shankar Gore) यांनी दिले आहेत. त्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सर्व दुकाने व आस्थापना यांना आपले फलक मराठी भाषेत (Marathi Language) लावणे बंधनकारक असणार आहे.

- Advertisement -

दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत असाव्यात, असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार मनपा आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रक काढून दुकाने व आस्थापनाने मराठीत फलक लावावेत, असे आदेश दिले आहेत. त्यासाठी 15 दिवसांची मुदतही देण्यात आली आहे. मराठी भाषेत (Marathi Language) फलक नसल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा (Hint) त्यांनी दिला आहे.

दरम्यान, संबंधित दुकानदार वा आस्थापनेचा प्रमुख आपला नामफलक मराठी बरोबरच आणखी इतर भाषेतही लिहू शकतो. मात्र, मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षराचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये, मद्यविक्री दुकानांच्या नामफलकांवर कुठेही गड-किल्ले, महनीय व्यक्तींचे नाव लिहीता येणार नाही, असेही शासनाच्या अधिसुचनेत स्पष्ट करण्यात आलेले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या