Friday, May 3, 2024
Homeनगरनगर - मारहाणीत एकाचा मृत्यू

नगर – मारहाणीत एकाचा मृत्यू

अहमदनगर । प्रतिनिधी । Ahmednagar

घरातील कुलदैवताच्या पेटीवरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. केडगावातील सोनेवाडी फाटा येथे ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आज आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी ढोल्या चव्हाण (रा. दुधसागर सोसायटी, केडगाव) असे मृत झालेल्याचे नाव आहे. विकी चव्हाण याला आठ जणांनी 2 सप्टेंबरला मारहाण केल्यानंतर त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. रूग्णालयातून घरी आल्यानंतर काल विकी मयत झाला.

- Advertisement -

नारायण झेंड्या चव्हाण, रुपेश नारायण चव्हाण, (दोघे रा. केडगाव), राहुल छोट्या काळे, विपुल छोट्या काळे, शास्त्रम छोट्या काळे, (रा. शास्त्रीनगर, केडगाव), बिनाका तुरा चव्हाण, बापकर्‍या इलासा काळे (रा. भोसले आखाडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मृत विकीची बहिण ताई सुरेश काळे हिने फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांच्या मुलीचे पुस्तक आणण्यासाठी जात असताना त्यांना त्यांचा भाऊ विकी काळे हा बेशुध्द अवस्थेत पडलेला दिसला. काही वेळाने तो शुध्दीवर आला. त्यानंतर त्याने मारहाण करणार्‍यांची नावे फिर्यादीला सांगितली. नारायण चव्हाण हा घरातील कुलदैवताची पेटी घेऊन गेला होता. त्याला विकी पेटी परत मागण्यासाठी गेला असता आरोपींनी दगड, विटांनी मारहाण केल्याचे विकीने बहिण ताईला सांगितले. तीन खासगी रूग्णालयामध्ये विकीवर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला रूग्णालयातून सुट्टी मिळाला. रविवारी (दि. 13) रोजी घरी गेल्यानंतर विकीचा मृत्यू झाला. आरोपींनी त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशानेच मारहाण केली. त्याच्या मृत्यूस तेच कारणीभूत असल्याचे सांगत ताई काळे हिने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस

- Advertisment -

ताज्या बातम्या