अहमदनगर | प्रतिनिधी
नगर, पुणे, बीड जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणाहून दुचाकी चोरी करून त्या ओळखीच्या लोकांना विक्री करणार्या राहुरी तालुक्यातील दोघांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले.
बाबासाहेब ज्ञानदेव खाडे (रा. लाख पढेगाव ता. राहुरी), अरूण सुधाकर जाधव (रा. टाकळीमियाँ ता. राहुरी) अशी जेरबंद केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांचा साथीदार किशोर जरसिंग पटारे (रा. पिंपळगाव माळवी ता. नगर) हा पसार झाला आहे. दरम्यान, जेरबंद केलेल्या दोघांच्या ताब्यातून 15 लाख रूपये किमतीच्या 29 दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
नगर शहरातून दुचाकी चोरीला जाणार्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या दुचाकी नक्की कोण चोरी करत आहे, व त्या दुचाकी जातात तरी कुठे याबाबत माहिती काढण्या करीता कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे रांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शना प्रमाणे एक पथक नियुक्त केले होते.
हे ही वाचा : संतापजनक! दिवसाढवळ्या फूटपाथवर महिलेवर अत्याचार होत होता अन् लोक…
त्यानुसार तांत्रिक विश्लेषन करून माहिती काढली असता किशोर जरसिंग पटारे हा नगर शहर व जिल्हा तसेच पुणे, बीड परिसरातील दुचाकी लग्न, अंत्यविधी, दशक्रियाविधी अश्या गर्दीच्या ठिकाणावरून चोरी करायचा. चोरीच्या दुचाकीची विल्हेवाट लावण्याकरीता पटारे हा त्याचे साथीदार बाबासाहेब ज्ञानदेव खाडे, अरूण सुधाकर जाधव यांच्या मदतीने ओळखीच्या लोकांना दुचाकीचे पेपर आणुन देतो तो पर्यंत तुम्ही दुचाकी वापरा त्या बदल्यात मला आत्ता दोन ते तीन हजार रूपरे द्या व नंतर दुचाकी तुमच्या नावावर केलयनंतर तीचे उर्वरीत पैसे द्या, असे सांगुन जवळपासच्या लोकांना चोरीच्या दुचाकी वापरण्यास देत असलयची माहिती मिळाली होती.
त्या प्रमाणे सदर पथकाने शोध मोहिम हाती घेतली असता किशोर जरसिंग पटारे हा पसार झाला. मात्र त्याचे साथीदार बाबासाहेब ज्ञानदेव खाडे व अरूण सुधाकर जाधव याना कोतवाली पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याची माहीती मिळताच किशोर पटारे याने चोरी केलेलय व त्याच्या ओळखीच्या लोकांना वापरायला दिलेल्या दुचाकी परत घेवुन या त्याच्या नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी बेवारस सोडलेलय असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी दाखवलेल्या ठिकाणावरून एकुण 15 लाख रूपरे किंमतीच्या 29 दुचाकी विविध ठिकाणावरून हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदर जप्त केलेल्या दुचाकी या संशयित आरोपींनी नगर, बीड, पुणे जिल्ह्यातील चोरी गेलेल्या आहेत.
हे ही वाचा : शरद पवार – अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले; सहकार मंत्र्यासमोरच घातला राडा!
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दराडे, उपनिरीक्षक महेश शिंदे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, गणेश धोत्रे, विक्रम वाघमारे, सूर्यकांत डाके, सलीम शेख, अविनाश वाकचौरे, अभय कदम, अमोल गाढे, सतिश शिंदे, अतुल काजळे, राम हंडाळ, वर्षा पंडीत, अशोक सरोदे, लक्ष्मण बोडखे, अनुप झाडबुके, पल्लवी रोहकले, पुजा दिक्कत, दक्षिण मोबाईल सेलचे अंमलदार राहुल गुंड्डू यांच्या पथकाने केली आहे.