Thursday, March 13, 2025
Homeनगरनगर-पुणे महामार्गावर बस व मोटारसायकलचा अपघात; एक ठार

नगर-पुणे महामार्गावर बस व मोटारसायकलचा अपघात; एक ठार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

नगर-पुणे महामार्गावर (Ahmednagar Pune Highway) वांघुडे बु. शिवारात शनिवारी दुपारी एसटी बस व मोटारसायकल यांचा अपघात (ST Bus and Bike Accident) होऊन मोटारसायकल स्वाराचा यात मृत्यू (Death) झाला. सुपा पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार शनिवारी दुपारी शिरुर आगाराची नगर-पुणे एसटी बस नगरहून पुण्याच्या (Pune) दिशेने जात होती. त्याच वेळी राहुल पांडुरंग गांगर्डे (वय 25 रा. मांदळी ता. कर्जत) मोटारसायकलवरुन पुण्याच्या दिशेने जात होता.

- Advertisement -

वाघुंडे बुद्रुक शिवारात हॉटेल इन्सपायरजवळ दुचाकी व एसटी बस यांच्यात अपघात (ST Bus and Bike Accident) होवून गांगर्डे गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक अरुण आव्हाड तात्काळ सहकार्‍यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी गांगर्डे यासह रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी गांगडे यासह मृत घोषित केले. पोलीसांनी (Police) अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...