Saturday, May 4, 2024
Homeनगरएसटी बसची स्कुटरला धडक; एक ठार

एसटी बसची स्कुटरला धडक; एक ठार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

अहमदनगर-पुणे महामार्गावर पवारवाडी घाटात सोमवारी दुपारी एसटी बसची धडक बसुन स्कुटर चालक ठार झाला.

- Advertisement -

याबाबत सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, सोमवार दि 15 ऑगस्ट 2022 रोजी अहमदनगर-पुणे महामार्गावर सुपा येथील पवारवाडी घाटातील पहिल्या वळणावर अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने जात असलेली शेवगाव- पुणे एसटी बस क्रमांक एमएच 14 बीटी 4879 या बसने याच गाडीच्या पुढे चालत आसलेल्या स्कुटरला धडक दिली. यात स्कुटर चालक दिनेश महेश दाने (रा.भुषण नगर केडगाव अहमदनगर) हे डांबरी रोडवर जोरात पडले त्यात त्यांना जबर मार लागला.

घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितिनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी पोलीस व त्याचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत नागरिकांनी जखमी दिनेश दाने यांना सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषीत केले. सुपा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदर मृतदेह उत्तराय तपासणीसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

अपघाताची साडेसाती संपेना…

अहमदनगर पुणे महामार्गावर सोमवारी सकाळीच वांघुडें शिवारात अपघात होऊन दोघे मृत पावले होते. दुपारी परत ही घटना घडल्याने अहमदनगर पुणे महामार्गावर सुपा पोलिस स्टेशन हद्दीत एकाच दिवशी तिघाचे निधन झाले असुन सुपा पोलिस स्टेशन हद्दीत गेल्या दहा पंधरा दिवसात आठ दहा व्यक्ती मृत पावल्या आहेत.

सुपा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे व महामार्ग पोलिस निरिक्षक श्री शशिकांत गिरी यांनी नुकतीच अहमदनगर पुणे महामार्गावरील ब्लाँक स्पॉटची (अपघाती क्षेञ) पहाणी करून त्यासंबधीचा अहवाल वरिष्ठ पोलिस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, बांधकाम ठेकेदार कंपनी यांना याबाबत अहवाल दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या