Saturday, May 18, 2024
Homeनगरनगर-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

नगर-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

रविवारी पहाटे अहमदनगर-पुणे महामार्गावर (Ahmednagar Pune Highway) पळवे (Palve) शिवारात एका अज्ञात वाहनाच्या धडकेने (Unknown Vehicle Hit) एका 40 वर्षीय पादचारी ठार झाला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, रविवार 13 ऑगस्ट रोजी अहमदनगर-पुणे महामार्गावर (Ahmednagar Pune Highway) पळवे खुर्दच्या शिवारात हॉटेल धनश्री जवळ पहाटे दोन वाजता एका आज्ञात वाहनाने धडक दिल्याने पुण्याकडून (Pune) नगरच्या दिशेच्या बाजुने एका 40 वर्षीय पादचार्‍याला अज्ञात वाहनाने जोराची धडक (Unknown Vehicle Hit) देत घटनास्थळावरून पसार झाले.

‘अशोक’चा माजी अध्यक्ष सोपान राऊतला अटक

या अपघातात (Accident) सदर व्यक्ती जखमी झाला होता. स्थानिक नागरिकांनी त्या जखमीस खाजगी रुग्णवाहीकेने नगर येथील जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) उपचारासाठी दाखल केले. परंतु त्याचा उपचारा आगोदरच मृत्यू झाला. त्याच्या उजव्या हातावर विठ्ठल रामा कांबळे असे गोंदलेले आहे. त्यास ओळखणार्‍या व्यक्तींनी सुपा पोलीस स्टेशनला संपर्क करावा असे आवाहन सुपा पोलिसांनी (Supa Police) केले आहे.

अहमदनगर पुणे महामार्गावर (Ahmednagar Pune Highway) अनेक गुमनाम व्यक्ती फिरत आसतात यात काही मानसिक आजारी असतात तर काही मनोरूग्ण असतात. राञीच्या वेळी वाहन चालक बेसुमारपणे वाहने चालवत असतांत आशा वेळी मनोरूग्ण वाहनांना आडवे आल्यावर अपघात होतात. मागील वर्षेभरतात या महामार्गावर मोठ्या संख्येने पादचारी व बेवारस मृतदेह आढळून आले असुन यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली साडे तेरा कोटींची फसवणूकइंदुरीकर महाराजांविरोधातील पुरावे न्यायालयासमोर सादर करणार

- Advertisment -

ताज्या बातम्या