Saturday, July 27, 2024
Homeनगरदोषविरहित मतदार यादीसाठी विशेष ग्रामसभा

दोषविरहित मतदार यादीसाठी विशेष ग्रामसभा

अहमदनगर | प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोषविरहित मतदारयादी तयार करण्याचे काम निवडणूक विभागाकडून सुरू आहे. प्रारूप मतदार यादी शुक्रवारी (दि.27) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदारयादीच्या जनजागृतीसाठी येत्या 4 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक गावाने विशेष ग्रामसभा घ्यावी, असे निर्देश निवडणूक उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिले आहेत.

- Advertisement -

केंद्रीय निवडणूक आरोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता तारखेवर आधारित प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी शुक्रवारी (दि. 27) प्रसिद्ध करण्यात आली. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तहसील कार्यालयात मतदार यादी नागरिकांना अवलोकनार्थ उपलब्ध आहे. सर्व नागरिकांनी येत्या 9 नोव्हेंबरपर्यंत मतदार यादीबाबत काही दावे, हरकती असल्यास योग्य पुराव्यासह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तहसील कार्यालयात सादर करावेत.

सर्व नागरिकांनी या मतदार यादीचे अवलोकन करावे. मतदार यादीतील दावे आणि हरकतींवर 26 डिसेंबरपर्रंत निकाली काढल्या जाणार आहेत. 1 जानेवारी 2024 रोजी अद्ययावत आणि पुरवणी यादी तयार केली जाणार आहे. निवडणूक आरोगाच्या मान्यतेने 5 जानेवारीला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या