अहमदनगर | प्रतिनिधी
चोरीला गेलेल्या दीड लाख रूपये किंमतीच्या पाच दुचाकी कोतवाली पोलिसांनी तक्रारदारांना परत केल्या आहेत. यापूर्वीही कोतवाली पोलिसांनी चोरीला गेलेल्या व पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या दुचाकी मूळ मालकांना परत केल्या होत्या. दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी पथकाची नेमणूक केली असून दुचाकी चोरांचा शोध सुरू आहे.
सनीत सुभाष खेत्रे (रा. वाहेगाव ता. गेवराई, जि. बीड, हल्ली रा. संभाजी कॉलनी, रेल्वे स्टेशन, नगर) याला बीड पोलिसांच्या मदतीने शोध घेऊन त्याच्याकडून एक लाख 50 हजार रूपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्या दुचाकी विनायक कुलकर्णी, अशोक रासकर, बिभीषन सिंग, भगवान वाघमारे, किशोर रावडे यांच्या होत्या त्या त्यांना देण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार राजेंद्र औटी, वसंत सोनवणे, कल्पना आरवडे, गोरक्ष काळे, संदीप साठे यांनी ही कारवाई केली आहे.