Sunday, May 26, 2024
Homeनगरप्रतिकूल परिस्थितीतून संवेदनशीलता येते

प्रतिकूल परिस्थितीतून संवेदनशीलता येते

मकरंद अनासपुरे । ‘थिंक ग्लोबल’च्या स्व. अमरापूरकर पुरस्काराचे वितरण

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रतिकूल परिस्थिती माझी जडण-घडण झाली. त्यातूनच माझ्यातील संवेदनशील मानून घडला. यामुळेच मी चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न करू शकलो. नाम फौंडेशनच्या माध्यमातून केलेलं काम करण्याची प्रेरणा पण याच संवेदनशीलतेतून मिळाल्याची भावना सुप्रसिद्ध अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यक्त केली. थिंक ग्लोबल फौंडेशनच्या स्व. अमरापूरकर पुरस्काराला उत्त्तर देताना आयोजित प्रकट मुलाखतीच्या वेळी ते बोलत होते.

- Advertisement -

चंद्रकांत कुलकर्णी यांनी ‘काय द्याच बोला’ या चित्रपटात मला हिरो म्हणून पहिल्यांदा संधी दिली. त्यामुळेच मला प्रेक्षकांनी नायक म्हणून स्वीकारलं आणि पुढे अनेक संधी मिळत गेल्या. मला मिळालेला अमरापूरकर पुरस्कार हा माझ्या एकट्याचा पुरस्कार नाही. कारण मला घडविण्यामध्ये अनेकांचं योगदान आहे. एक गाव सावरखेड या चित्रपटात मला स्व. सदाशिव तात्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली होती हे मी माझ भाग्य समजतो.

अभिनय आणि सामाजिक कार्य विभागातून अनासपुरे यांना रु. 51000, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आले. प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी गायकवाड आणि राज्याचे साखर तथा कृषी आयुक्त शेखर गायकवाड या दोन सनदी अधिकार्‍यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हिवाळी अधिवेशनामुळे उपस्थित राहू न शकलेल्या गायकवाड यांच्या वतीने त्यांच्या पत्नी वंदना गायकवाड यांनी पुरस्कार स्वीकारला. सुप्रसिद्ध सिने-नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते पुरस्कार्थींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते.

अनासपुरे, कुलकर्णी यांच्या सह सर्वच मान्यवरांनी किरण काळे यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. प्रास्ताविक फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी केले.प्रसाद बेडेकर यांनी मकरंद अनासौरे यांची प्रकट मुलाखत घेतली. स्वागत प्राचार्य बी.एच. झावरे यांनी केले.

यावेळी जिल्हा मराठा संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, अ‍ॅड. विश्वासराव आठरे पाटील, अ‍ॅड. दीपलक्ष्मी म्हसे पाटील, सीताराम खिलारी, प्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.झावरे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव काळे, श्रीराम पिंगळे, शेखर देशमुख, अमोल खोले, दिलीप पुंड, रमाकांत काठमोरे आदी उपस्थित होते.

हशा अन् चिमटे…
किरण काळे यांनी दिग्दर्शक कुलकर्णी यांच्या आजचा दिवस माझा या चित्रपटातले मुख्यमंत्री कसे संवेदनशील दाखवले आहेत आणि आय.ए.एस. अधिकारी कसे चांगल्या पायात आडवा पाय टाकतात हे दाखविल्याचे सांगितले. पण सोळंकी आणि गायकवाड हे चांगल्या कामांची वाकडी फाईल सरळ करणारे अधिकारी असल्याचे सांगितले आणि हशा पिकला. माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी कुलकर्णी यांच्यावर कोटी करीत तुम्ही किती पण चित्रपट काढा पण राजकारणी बधीर झालेले आहेत. त्यांच्यात तरी सुद्धा तसू भरही फरक पडणार नाही असे म्हणताच सभागृहात एकाच हशा पिकला.

- Advertisment -

ताज्या बातम्या