अहमदनगर | प्रतिनिधी
येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti Corruption Bureau) पोलीस निरीक्षक श्याम पवरे (Shyam Paware) व दीपक करांडे (Dipak Karande) यांची अन्यत्र बदली झाली आहे.
पवरे यांची महामार्ग सुरक्षा पथकात, तर करांडे यांची कोल्हापूर (Kolhapur) परिक्षेत्रात बदली झाली आहे. या दोघांना नुकतेच कार्यमुक्त करण्यात आले. त्याचबरोबर हेड कॉन्स्टेबल तनवीर महंमदअली शेख व नाईक प्रशांत रामकृष्ण जाधव यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची यापूर्वीच पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर येथे बदली झालेली आहे.
त्यांच्या ऐवजी हेड कॉन्स्टेबल संतोष चंद्रकांत शिंदे व बाबासाहेब एकनाथ कराड यांची प्रतिनियुक्तीवर नेमणुक करण्यात आली. कोणीही लोकसेवक सर्व सामान्य जनतेला त्यांचे काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, अहमदनगर येथे खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी केले आहे.