Monday, May 27, 2024
Homeनगरनगर शहरातून दोन अल्पवयीन मुलींना पळविले

नगर शहरातून दोन अल्पवयीन मुलींना पळविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरातून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याच्या घटना मंगळवारी (दि. 15) घडल्या. याप्रकरणी कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

नागापूरमध्ये राहणार्‍या महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी सावेडीतील एका शाळेत शिक्षण घेते. ती मंगळवारी सकाळी सात वाजता शाळेत चालले म्हणून घराच्या बाहेर पडली. दरम्यान, तिने 11 वाजता फिर्यादीला फोन करून सांगितले की, माझा चष्मा खराब झाला आहे तो दुरूस्त करण्यासाठी नेत्रालयात चालले आहे. काही वेळाने फिर्यादीने मुलीच्या मोबाईलवर संपर्क केला असता तिचा फोन बंद होता. फिर्यादी यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलीस मुलीचा शोध घेत आहेत.

सर्जेपुरा भागात राहणार्‍या पुरूषाने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी मंगळवारी दुपारी त्यांच्या भावजईसोबत कापडबाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या. कापडबाजारातील मोची गल्लीत त्या दोघी पाणीपुरी खात असताना अचानक मुलगी नजरचुकवून गायब झाली. फिर्यादी व भावजई यांनी तिचा शोध घेतला ती मिळून आली नाही. दरम्यान, तिने एका अनोळखी नंबरवरून फिर्यादी यांना संपर्क करून, मी नार्‍या (पूर्ण नाव माहिती नाही) सोबत आले आहे, आम्ही लग्न गेले आहे, असे कळविले. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस मुलीचा शोध घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या