Monday, May 20, 2024
Homeनगरविनायक देशमुख पुन्हा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस

विनायक देशमुख पुन्हा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस

अहमदनगर | प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (Maharashtra Pradesh Congress Committee) सरचिटणीसपदी विनायक देशमुख (Vinayak Deshmukh) यांची सलग दुसर्‍यांदा निवड करण्यात आली आहे. यापूर्वीच्या कार्यकारणीत जिल्ह्यातून देशमुख व माजी आ. नंदकुमार झावरे (Nandkumar Zavre) हे दोन सरचिटणीस होते. या वेळी मात्र जिल्ह्यातून केवळ देशमुख यांचीच या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्या मान्यतेने काँग्रेसचे महासचिव खासदार के.सी वेणूगोपाल (KC Venugopal) यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची (New executive of Maharashtra Congress) घोषणा केली. नव्या कार्यकारिणीत राज्यातून उपाध्यक्षपदी 18, सरचिटणीसपदी 65 तर 104 जणांची तर प्रवक्तेपदी 6 जणांची निवड करण्यात आली आहे.

देशमुख यांनी जिल्हा युवक काँग्रेस (Youth Congress) अध्यक्ष (1994 ते 1998), जिल्हा सरचिटणीस (1998 ते 2002), जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष (2002 ते 2004), जिल्हा काँग्रेस अध्यक्ष (2004 ते 2009), योजना सनियंत्रण समितीचे प्रदेशाध्यक्ष (2010 ते 2014) म्हणूनही काम केले आहे. 2016 पासून त्यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती आता दुसर्‍यांदा त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर सलग दुसर्‍यांदा नियुक्ती होणारे ते एकमेव पदाधिकारी आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या