Sunday, September 22, 2024
Homeनगरपावसाला पोषक वातावरण; जिल्ह्यात दोन दिवस यलो अर्लट

पावसाला पोषक वातावरण; जिल्ह्यात दोन दिवस यलो अर्लट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

राज्यात सध्या हिवाळ्याची चाहूल लागल्यासारखे वाटत असतानाच पुन्हा एकदा पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, चक्राकार वार्‍यांची स्थिती उत्तर अंदमान समुद्रात व आजूबाजूच्या परिसरात पुढील 24 तासांसाठी सक्रिय राहणार आहे. राज्यात विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात सोमवार व मंगळवारी पावसाचा यलो अर्लट जारी करण्यात आला आहे.

राज्यात 23 व 24 सप्टेंबर रोजी जोरदार पावसाची हजेरी राहणार असून कोकण वगळता बहुतांश राज्यात पावसाचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात तसेच विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यावर्षी 17 सप्टेंबर ही तारीख उलटून गेली तरी राजस्थान, गुजरात, उत्तराखंडसह वायव्य भारतातून मॉन्सूनच्या परतीसाठी अद्यापही पोषक स्थिती दिसत नाही. मागील पाच वर्षांच्या मॉन्सूनच्या परतीच्या वाटचालीवर नजर टाकली असता सप्टेंबर शेवटी ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वायव्य भारतातून मॉन्सूनने परतीची वाटचाल सुरू केली. वायव्य भारतातून मॉन्सूनने माघार घेतल्यानंतर महाराष्ट्रातून परतीच्या वाटचालीस 15 ते 20 दिवस लागतात. मॉन्सून परतत असताना राज्याच्या काही भागांत पाऊस होतो.

विकेंडला मुसळधार
अति वायव्य राजस्थान व कच्छ परिसरातून वायव्यई वारा, खालावणारी आर्द्रता व इतर काही वातावरणीय बदलानुसार, सोमवार 23 सप्टेंबरपासून मान्सून परतण्याची शक्यता जाणवते. मान्सूनने जरी तोंड फिरवले तरी इतर काही वातावरणीय घडामोडीतून तो सुरवातीचे काही दिवस जागेवरच खिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबर 21 ते 24 च्या दुसर्‍या आवर्तनातील पावसाची सुरवात प्रथमत: विदर्भात जोरदारपणे व त्यानंतर मराठवाड्यात मध्यम तीव्रतेने तर मुंबईसह कोकण, खांदेश व नाशिक, अहमदनगरख पुणे, सातारा सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात किरकोळ हलक्या पावसाने सुरवात होण्याची शक्यता जाणवते. राज्यात सप्टेंबर 26 ते 29 दरम्यानच्याच्या तिसर्‍या आवर्तनातील चार दिवसात मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, उत्तर नगर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती वर्धा, नागपूर, भंडारा गोंदियाया जिल्ह्यात जोरदार अति जोतदार पावसाची शक्यता जाणवते. तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता जाणवते. त्यातही 26, 27 ला खांदेश नाशिक, अहमदनगर व सभोंवतलातील परिसरात व 28, 29 ला मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी जिल्ह्यात अति जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी तथवा ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या