Saturday, September 14, 2024
Homeनगरलिंकव्दारे बँक खात्यातून अडीच लाख लांबविले

लिंकव्दारे बँक खात्यातून अडीच लाख लांबविले

अहमदनगर (प्रतिनिधी)

- Advertisement -

सायबर फसवणूकीत वाढ झाली असून एखाद्या व्यक्तीला आलेला फेक कॉल त्याचे पूर्ण खाते रिकामे करतो. अशीच एक घटना नगर तालुक्यात घडली आहे. एका अनोळखी व्यक्तीने आयसीआय बँकेतून बोलतो, तुमचा ऑनलाईन प्रॉब्लेम आहे, असे सांगून एकाच्या बँक खात्यातून दोन लाख 61 हजार 648 रूपयांची रक्कम काढून घेत फसवणूक केली. शिवाजी भिकाजी कर्डिले (वय 43 रा. जखणगाव ता. नगर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना दि. 13 रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

याप्रकरणी कर्डिले यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एका मोबाईल नंबर धारक व्यक्ती विरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी व्यक्तीने एका मोबाईल नंबरवरून फोन करून आयसीआय बँकेतून बोलत असल्याचे कर्डिले यांना सांगितले. तुमचा ऑनलाईन प्रॉब्लेम आहे. आजच क्लिअर करावा लागेल, असेही सांगून कर्डिले यांचा विश्‍वास संपादन केला. त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवर एक लिंक पाठवून कर्डिले यांच्या डेबीट कार्डचा फोटो घेतला. लिंकमधून कर्डिले यांची गोपनीय माहिती घेत त्यांच्या बँक खात्यातून 97 हजार 800, 99 हजार 850, 14 हजार 999, 23 हजार 999 आणि 25 हजार अशी रक्कम काढून फसवणूक केली. फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याने अधिक सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या