Saturday, April 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAI Impact Summit 2026 - भारत-ब्रिटन द्विपक्षीय बैठकीत ए आय व उदयोन्मुख...

AI Impact Summit 2026 – भारत-ब्रिटन द्विपक्षीय बैठकीत ए आय व उदयोन्मुख तंत्रज्ञान सहकार्य मजबूत करण्यावर भर

दिल्ली | वृत्तसंस्था Delhi

- Advertisement -

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान; आणि पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारत मंडपम येथे सुरू असलेल्या एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या निमित्ताने ब्रिटनचे एआय आणि ऑनलाइन सुरक्षितता मंत्री कनिष्क नारायण यांच्यासमवेत द्विपक्षीय बैठक घेतली.

या बैठकीत भारत-ब्रिटन यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि दीर्घकालीन द्विपक्षीय विज्ञान आणि तंत्रज्ञान भागीदारीच्या चौकटीत संशोधनाभिमुख नवोन्मेषांमध्ये भारत-ब्रिटन सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

भारत आणि ब्रिटन हे विज्ञान आणि नवोन्मेष परिषदेत स्थित एका संस्थात्मक यंत्रणेअंतर्गत काम करत आहेत, जी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय वैज्ञानिक सहकार्याचा आढावा घेणारी सर्वोच्च संस्था आहे. या परिषदेची पुढील बैठक एप्रिल 2026 मध्ये भारतात होणार आहे.

दोन्ही मंत्र्यांनी एप्रिल 2023 मध्ये स्वाक्षरी केलेल्या भारत-ब्रिटन संशोधन आणि नवोन्मेष सामंजस्य कराराच्या प्रगतीचा आढावा घेतला, जो दीर्घकालीन शाश्वत विकासासाठी सरकारी संस्था, उच्च शिक्षण संस्था, संशोधन संस्था, स्टार्टअप्स आणि उद्योग यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन देतो. डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवोन्मेष आणि तंत्रज्ञान परिसंस्थांमधील भारताची जलद प्रगती सामायिक केली, जी जागतिक नवोन्मेष निर्देशांकात 2015 मधील 81 व्या स्थानावरून 2025 मध्ये 38 व्या स्थानी घेतलेली झेप अधोरेखित करते. ते म्हणाले की, भारताची व्याप्ती , डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, विस्तारणारे स्टार्टअप बेस आणि मजबूत संशोधन क्षमता यामुळे जागतिक तंत्रज्ञान सहकार्यासाठी भारत एक पसंतीचा भागीदार बनला आहे.

या चर्चेत दूरसंचार संशोधन, स्वच्छ ऊर्जा, जैवतंत्रज्ञान आणि शेती, महासागर आणि हवामान विज्ञान, प्रगत सामग्री आणि उत्पादन आणि क्वांटम तंत्रज्ञान या क्षेत्रातील विद्यमान संयुक्त उपक्रमांचा समावेश होता. डीएसटी-यूकेआरआय दूरसंचार सहकार्याअंतर्गत, पुढील पिढीतील संप्रेषण तंत्रज्ञानातील संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. औद्योगिक संशोधन आणि विकास क्षेत्रात, दोन्ही देश नेट झिरो तंत्रज्ञान, प्रगत उत्पादन, नवीकरणीय ऊर्जा साठवणूक आणि शाश्वत प्रणालींमधील प्रकल्पांना पाठिंबा देत आहेत.

भारतीय शिष्टमंडळात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा . अभय करंदीकर; पृथ्वी विज्ञान मंत्रालय, जैवतंत्रज्ञान विभाग आणि परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ प्रतिनिधी; विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे आंतरराष्ट्रीय सहकार्य सल्लागार आणि प्रमुख डॉ. प्रवीणकुमार सोमसुंदरम; आणि वैज्ञानिक डॉ. सुलक्षणा जैन यांचा समावेश होता.

ब्रिटनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व कनिष्क नारायण यांनी केले, जे ब्रिटनचे एआय आणि ऑनलाइन सुरक्षितता मंत्री म्हणून कार्यरत आहेत आणि एआय संधी, सेमीकंडक्टर, बौद्धिक संपदा, तंत्रज्ञान विकास आणि ऑनलाइन सुरक्षितता निरीक्षण हे काम देखील पाहतात. सोफिया नेस्टियस-बूथ, प्रादेशिक संचालक, विज्ञान आणि तंत्रज्ञान नेटवर्क, ब्रिटिश उच्चायोग; . जॅक लँडर्स, विज्ञान आणि नवोन्मेष प्रमुख; आणि . जॅक कॉलिन्स, मंत्र्यांचे खाजगी सचिव यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

ताज्या बातम्या

बारामती

Baramati ByPoll Elections: बारामती पोटनिवडणुकीसाठी जोरदार राजकीय हालचाली; सुनेत्रा पवारांचा उध्दव...

0
मुंबई | Mumbaiबारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या अनुषांगाने राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महायुती बारामतीची पोटनिवडणुक बिनविरोध करण्याच्या तयारीत असतानाच काँग्रेसने दोन्ही ठिकाणी...