Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAir Ambulance Crash : रांचीहून दिल्लीला जाणारे विमान कोसळले

Air Ambulance Crash : रांचीहून दिल्लीला जाणारे विमान कोसळले

रांची येथून दिल्लीकडे निघालेल्या एअर अ‍ॅम्ब्युलन्सचा टेकऑफनंतर काही वेळातच संपर्क तुटून अपघात झाल्याचे समजते . झारखंडमधील चतरा जिल्हा व सिमरिया सीमेवरील जंगल परिसरात चार्टर विमान कोसळल्याची माहिती आहे. विमानात रुग्णासह एक डॉक्टर, पॅरामेडिक, दोन अटेंडंट, पायलट आणि सह-पायलट असे एकूण 7 जण असल्याचे समजते.

विमानाने सायंकाळी 7:11 वाजता उड्डाण केले असल्याचे समजते , त्यानंतर संपर्क तुटला. विमानाचे शेवटचे लोकेशन लातेहार आणि पलामू दरम्यानच्या डोंगराळ, घनदाट जंगल भागात असल्याचे समजते. खराब हवामान, मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानता यामुळे अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

- Advertisement -

घटनेत जीवितहानी झाली का याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. स्थानिक प्रशासन आणि पोलीस बचाव कार्यात गुंतले असून अनेकांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...