Sunday, September 8, 2024
Homeमनोरंजनहवाई सुंदरी ते अभिनेत्री! ‘असा’ आहे प्रतिक्षा होन्मुखेचा फिल्मी प्रवास

हवाई सुंदरी ते अभिनेत्री! ‘असा’ आहे प्रतिक्षा होन्मुखेचा फिल्मी प्रवास

झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कैसे मुझे तुम मिल गये’ ने हल्लीच एक रोमांचक वळण घेत विराटची पूर्वपत्नी प्रियांका ऊर्फ प्रतिक्षा होन्मुखेचा मालिकेत प्रवेश घडवून आणला. आपली व्यक्तिरेखा ती ज्या प्रभावी पद्धतीने साकारत आहे केवळ त्यावरूनच ती वेगळी ठरत नाही तर ह्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तिने जो वेगळा मार्ग निवडला आहे त्यावरूनही ती सर्वांपेक्षा भिन्न असल्याचे सिद्ध होते.

सात वर्षे हवाई सुंदरीचे काम केल्यानंतर प्रतिक्षाने आपले यशस्वी हवाई करिअर सोडून आपली आवड असलेल्या अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचे ठरवले. एका सहकाऱ्यामुळे प्रेरित होऊन आणि आपल्या पालकांच्या समर्थनासह तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात पदार्पण केले आणि तिथेही आपली कला दाखवून दिली. त्यातूनच पुढे तिला टेलिव्हिजन शोज्‌मध्ये काम करण्याच्याही संधी मिळत गेल्या.

- Advertisement -

प्रतिक्षा म्हणाली, आयुष्य हे काही बेधडक पाऊले उचलण्याबद्दल आणि आपले हृदय काय सांगते ते ऐकण्याबद्दल आहे. हवाई सुंदरी म्हणून मी सात वर्षे काम करताना मला शिस्त, चिवटपणा आणि सहानूभूति ह्या गोष्टींचे महत्त्व कळले. ह्याच गुणांमुळे मला माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्येही अतिशय उत्तम फायदा होत आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रात माझे नशीब आजमवण्यासाठी मला माझ्या सहकाऱ्यांकडून प्रेरणा आणि माझ्या पालकांकडून समर्थन मिळाले याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते.

मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम केल्यामुळे मला बऱ्याच संधी मिळाल्या आणि जसे मी एव्हिएशन क्षेत्र सोडले, मला लगेचच टेलिव्हिजन उद्योगात काम करण्याचे भाग्य लाभले. तुम्हांला आयुष्यात जे काही बनायचं आहे ते बनण्यासाठी तुमच्याकडे नक्कीच पुरेसा वेळ असतो. मला अभिनय करायला आवडतो आणि त्यामुळेच मी अनेक ऑडिशन्स दिल्या. ‘कैसे मुझे तुम मिल गये’मध्ये प्रियांकाची भूमिका साकारायला मला मजा येत आहे. आयुष्यातील प्रत्येक अनुभव हा तुम्हांला पुढच्या अनुभवासाठी तयार करत असतो आणि सध्या माझे लक्ष प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करण्यावर केंद्रित आहे.”

प्रतिक्षा होन्मुखे आपल्या अभिनयासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत अनेकांसाठी प्रेरणाही बनत आहे. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि आपली नियती पुन्हा एकदा लिहिण्यासाठी कुठलीही वेळ ही योग्यच असते हे तिने सिद्ध केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या