Monday, November 18, 2024
Homeदेश विदेशएअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचाऱ्यांनी मारली सामूहिक दांडी; ७८ उड्डाणं रद्द

एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचाऱ्यांनी मारली सामूहिक दांडी; ७८ उड्डाणं रद्द

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आज अचानक एअर इंडियाने एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसची ७८ उड्डाणे रद्द केली आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. वरिष्ठ क्रू मेंबर्सने आजारपणाचे कारण पुढे करत सामूहिक सुट्टी घेतल्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसची अनेक उड़्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच काही विमानांचे उड्डाण पुढे ढकलण्यात आले आहे.

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे विलिनीकरण होणार आहे. त्यामुळे आपली नोकरी धोक्यात येऊ शकते असे दोन्ही एअरलाईन्सच्या वैमानिक आणि केबिन क्रृला वाटत आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी या निर्णयाविरोधात असून सामूहिक रजेवर गेले आहेत. याचा परिणाम ७८ आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. एअर इंडियामध्ये एक्स कनेक्ट विलीन करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून ही समस्या आणखी वाढली आहे.

- Advertisement -

एक्स्प्रेसने सांगितले की, वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी अचानक सीक लिव्ह टाकल्याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान सेवेवर परिणाम झाला आहे. मंगळवारी रात्री या आंदोलनाने मोठे स्वरूप घेतले. रद्द करण्यात आलेल्या फ्लाईट या मध्य पूर्व आणि गल्फ देशांना जाणाऱ्या आहेत. तसेच अनेक विमानांना विलंबही होत आहे.

दरम्यान, एक्सप्रेसने पुढे सांगितले की, वैमानिक आणि क्रृ मेंबर्सशी संवाद साधून यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या प्रवाशांना झालेल्या मनस्तापाचे निराकरण लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” ज्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे, त्यांना तिकीटाचे पैसे परत केले जातील किंवा त्यांची इच्छा असल्यास पुन्हा नवी तिकीटे त्यांना दिली जातील, असेही या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या