नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिकच्या सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांच्या सूक्ष्म कलेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली असून त्यांना कुठल्याही प्रकारची भिंगाचा वापर न करता सूक्ष्म चित्र काढणारी पहिली महिला सूक्ष्म चित्रकार म्हणून अधिकृत घोषणा संस्थेच्या अधिकृत संकेत स्थळावर करण्यात आली आहे.
या संदर्भातील प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व मेडल त्यांना गुरुवार (दि.8) मिळाले आहे. देशातील व बाहेरील देशातील अनेक सूक्ष्म चित्रकार हे चित्र काढत असताना विविध प्रकारच्या भिंगांचा वापर करत चित्र काढत असतात. परंतु नाशिकच्या औसरकर यांनी कुठल्याही प्रकारचा भिंगाचा वापर न करता चक्क 1.40 मी. मी. इतक्या सूक्ष्म राईवरती छत्रपती शिवरायांचे रंगीत चित्र साकारत आपले नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे.
लंडनमधील प्रसिद्ध नामांकित संस्था वर्ल्ड वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने देखील त्यांच्या कलेची दखल घेतली आहे.