Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar : "ढाण्या थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर.."; अजितदादांचा...

Ajit Pawar : “ढाण्या थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर..”; अजितदादांचा रोहित पवारांना मिश्किल टोला

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ( Maharashtra Assembly Elections) महायुतीचा (Mahayuti) एकहाती विजय झाला, तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आज राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महायुती व महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कराड येथे यशवंतराव चव्हाणांच्या प्रीतीसंगमावर हजेरी लावली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची भेट झाली. त्यावेळी अजित पवारांनी रोहित पवार यांना आपल्या शैलीत जोरदार टोला लगावला.

- Advertisement -

रोहित पवार आणि अजित पवार (Rohit Pawar and Ajit Pawar) यांची प्रीतीसंगमावर भेट झाली त्यावेळी रोहित पवार हे अजित पवारांच्या पाया पडले. यावेळी अजित पवारांनी ‘शहाण्या थोडक्यात निवडून आलास दर्शन घे काकाचं असं रोहित पवारांना मिश्कीलपणे म्हटले. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर रोहित पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता, अजित पवारांना खाली वाकून नमस्कार केला. यानंतर रोहित पवारांना निवडून आल्याबद्दल अजित पवारांनी अभिनंदन केले आणि थोडक्यात वाचलास असं म्हटले. त्यानंतर अजित पवार यांनी रोहित पवारांना ‘माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं विचार कर’ असे म्हणत टोला लगावला.

दरम्यान, अजित पवारांची भेट झाल्यानंतर रोहित पवार म्हणाले की, “अजित पवार माझे काका आहेत, म्हणून मी पाया पडलो. शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणे माझी जबाबदारी आहे. माझी सभा झाली असती, तर अडचण झाली असती. असे विधान देखील अजित पवारांनी केले. यावर रोहित पवारांना विचारले असता नक्कीच अजित पवारांनी सभा झाली असती तर वर-खाली झालं असतं, उलटंही होऊ शकलं असतं. पण ते बारामतीमध्ये अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. शेवटी अजित पवार मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. त्यांचे आमदार (MLA) देखील मोठ्या प्रमाणात निवडून आले आहे. चांगली गोष्ट आहे, मी त्यांचे अभिनंदन देखील केले, असे रोहित पवार यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...