Monday, June 24, 2024
Homeमुख्य बातम्याउत्तर नाही, उत्तरदायित्वाची सभा! अजित पवारांच्या बीडच्या सभेचा टीझर लाँच, शरद पवारांचा...

उत्तर नाही, उत्तरदायित्वाची सभा! अजित पवारांच्या बीडच्या सभेचा टीझर लाँच, शरद पवारांचा फोटो वापरणे टाळले

बीड | Beed

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभांचा धडाका लावला आहे. काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी बीडमध्ये सभा घेतली होती. आता या सभेला प्रत्युत्तर म्हणून आज उपमुख्यमंत्री अजित पवार सभा घेणार आहेत. या सभेची बीडमध्ये जोरदार तयारी केली आहे.

या सभेचा टीझर स्वत:धनंजय मुंडेंनी त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. विशेष म्हणजे सभेच्या टीझरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो वापरण्यात आला नसल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच्या सभेचा टीझर ट्विट केला आहे. यात त्यांनी जाहीर सभा…! सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची अन दुष्काळ मिटवण्याची…! मी येतोय, तुम्ही येताय ना…? अशी टॅगलाईन देत सभेचा टिझर प्रसिध्द केला आहे. पण या टीझरमध्ये शरद पवारांचा फोटो वापरण्यात आलेला नाही.

बीड शहरात सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मोठा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अण्णा भाऊ साठे पुतळा, जालना रोड, बार्शी रोड व नगर रोडवर जागोजागी स्वागत बॅनर, भव्य कटआउट्स तसेच स्वागत कमानी उभारल्या आहेत. सभेला लोकांसाठी अनेक ठिकाणांहून परिवहन महामंडळाच्या बसही लावल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या