Friday, November 22, 2024
HomeराजकीयAjit Pawar : अमित शाहांसमोर 'बिहार पॅटर्न'प्रमाणे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला का? अजित...

Ajit Pawar : अमित शाहांसमोर ‘बिहार पॅटर्न’प्रमाणे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला का? अजित पवार म्हणाले…

मुंबई | Mumbai

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह (Amit Shah) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) त्यांच्यासोबत दिसले नाहीत. मात्र,अमित शाह दिल्लीला रवाना होण्याआधी अजित पवार यांनी शाहांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. या भेटीवेळी अजित पवार यांनी गृहमंत्री शाह यांच्यापुढे ‘बिहार पॅटर्न’प्रमाणे महाराष्ट्रातही मुख्यमंत्रिपद ठरवा, असा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर आता अजित पवारांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : अन् मला मुख्यमंत्री करा…; अजित पवारांनी अमित शाहांकडे केली इच्छा व्यक्त?

अजित पवार म्हणाले की,”मी मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्रिदाबाबत शाह यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. राज्यात सध्या कापूस-सोयाबीनचा प्रश्न आहे. कांदा निर्यात बंदी होऊ द्यायची नाही. कांद्यातून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असतील, तर ते कसे मिळतील हे बघायला पाहिजे. बरीच वर्ष एमएसपीचा दर ठरलेला नाही. एफआरपी चार-पाचवेळा वाढली हे विषय मी त्यांच्या कानावर घातले” असे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : “भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला, विधानसभेत अजितदादांना ७, तर शिंदेंना….”; रोहितपवारांचा सर्वात मोठा दावा

तसेच महायुतीत (Mahayuti) मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते का? असा प्रश्न अजित पवारांना विचारला असता ते म्हणाले की, “असं काहीही होणार नसून या सगळ्या थापा आहेत. सगळेजण बसून २८८ जागा कुठल्या-कुठल्या पक्षाला देण्यात येतील, हे ठरणार आहे. बऱ्याच जागांवर चर्चा झाली आहे. अजून काही जागांबाबत चर्चा राहिली आहे. जेव्हा आमचं अंतिम ठरेल, तेव्हा याची माहिती देण्यात येईल, असे अजित पवारांनी म्हटले. त्याचबरोबर महायुतीच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. महायुती सरकारने जी विकासकामे केली आहेत त्याची माहिती लोकांना द्यायची आहे, असेही ते म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या