Monday, June 17, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांसोबतच्या गुप्त भेटीबाबत अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले...

शरद पवारांसोबतच्या गुप्त भेटीबाबत अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले…

कोल्हापूर | Kolhapur

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. दोघेही शनिवारी दिवसभर पुण्यात होते. त्यामुळे या चर्चेला पुष्टी मिळत होती. जयंत पाटील हेही यावेळी उपस्थित होते. या बैठकीवरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. या चर्चांवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: त्या दिवशी काय झालं याची माहिती दिली.

पुण्याच्या बैठकीमुळे कोणताही संभ्रम नाही. शरद पवारांनी स्वत: सांगितलं की ते पवार कुटुंबातले ज्येष्ठ आहेत. मी त्यांचा पुतण्या लागतो. घरातल्या व्यक्तीला भेटणं यात विनाकारण त्याला वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी दिली जात आहे. तिथे फार काही वेगळं घडलं असं समजण्याचं कारण नाही, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, बैठकीला लपून गेल्याची चर्चा असल्याबाबत विचारणा केली असता अजित पवारांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. मी तिथे भेटायला लपून गेलो नाही. मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे. मला काय गरज आहे लपून जायची? मी कुणाच्या घरी गेलो, तर मी तिथून कधी बाहेर निघायचं हा माझा अधिकार आहे. मी बैठकीला गेलो हे मान्य करतो ना मी, असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, ज्या उद्योगपतीच्या घरी भेट झाली, त्या चोरडियाच्या दोन पिढ्याचे आमचे संबंध आहेत. चोरडीयाचे वडिल पवार साहेबांचे क्लासमेट होते. पवार साहेब कार्यक्रम संपवून येणार होते. त्यानंतर जयंत पाटील आणि पवार साहेबांना चोरडीया यांनी जेवायला बोलावलं होतं. त्यानंतर मला देखील बोलवण्यात आले. त्यानंतर मी गेलो. परंतु काका पुतण्याने भेट घेतली, यात गैर काय? असा सवाल देखील अजित पवार यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या