Friday, November 22, 2024
Homeराजकीयअखेर तो क्षण आलाच! 'मी अजित आशा अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री...

अखेर तो क्षण आलाच! ‘मी अजित आशा अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…’

मुंबई | Mumbai

सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांना अनेकदा मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे.मात्र, उपमुख्यमंत्रीपदावर सर्वाधिक वेळा विराजमान होण्याच रेकॉर्ड अजित पवार यांच्याच नावावर आहे. पंरतु, अजित पवारांनी आगामी काळात मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे. अनेकदा भावी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचे फलक देखील झळकले आहेत. त्यानंतर आता याचीच पुनरावृत्ती पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळाली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मावळली; शिंदे गटातील इच्छुकांचा हिरमोड

अजित पवार (NCP Ajit Pawar) यांचा उद्या म्हणजेच २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. मात्र, त्यापूर्वी आज अजित पवार हे पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) दौऱ्यावर होते. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. इतकंच नाही, तर कार्यकर्त्यांनी यावेळी अनोखा केक देखील आणला.

हे देखील वाचा : मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकले हरवलेले बाबा; विरोधकांचं टीकास्त्र

या केकवर ‘मी अजित आशा अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…’ अशा आशयाचा मजकूर देखील छापण्यात आला होता.यावेळी हा केक आपल्या लाडक्या नेत्याने कापावा, अशी इच्छा कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. कार्यकर्त्यांनी आणलेल्या या केकवरील अनोख्या शुभेच्छा संदेशामुळे हा केक सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : विजेच्या धक्क्याने बिबट्या आणि मोराचा मृत्यू

दरम्यान, अजित पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये आज म्हणजे रविवारी सकाळपासून विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. काळेवाडी येथील एका हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा असून यादरम्यान ते पदाधिकारी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. काही तासांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पिंपरीत मेळावा पार पडला. त्यानंतर आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या