Friday, April 25, 2025
Homeमुख्य बातम्याAjit Pawar : "मी पहाटे ४ वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो आणि...";...

Ajit Pawar : “मी पहाटे ४ वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो आणि…”; अजित पवारांनी सर्वच सांगितलं

पुणे(प्रतिनिधी)

आमचे सरकार २४ तास जनतेच्या सेवेत असल्याचे सांगितलं. मी पहाटे ४ वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो आणि कामाला सुरुवात करतो. साधारण १० ते ११ पर्यंत काम करतो. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ११ ते २ काम करतात. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री २ ते ४ या वेळेत काम करतात. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे सरकार सदैव तत्पर आहे, असे उपमुगयमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले.

- Advertisement -

पुण्यात आज राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र या इमारतीचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, राज्य सरकारची कोणतीही कार्यालये भाडेतत्त्वावर ठेवायची नाहीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनतेला उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी महायुती सरकार काम करत आहे. येत्या दोन-तीन वर्षात सर्व इमारतींचे काम पूर्ण झाले पाहिजे. मला सरकारी कार्यालये चांगली करण्याची आवड आहे. नागरिकांना आवश्यक सुविधा मिळायला पाहिजेत. पार्किंगची समस्या मोठी आहे. त्यामुळे आता बांधल्या जाणाऱया इमारतींमध्ये पार्किंगची व्यवस्था केली जाईल.

सर्व सरकारी इमारतींवर सौर पॅनेल बसवले जातील आणि वीज निर्मिती कशी करता येईल, याचा विचार सुरू आहे. आरोग्याच्या सर्व सुविधा एकाच छताखाली आणण्याचे काम सुरू आहे. राज्यातील जनतेला जलद आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देणं हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. ससून रुग्णालयाला आवश्यक निधी दिला जात आहे. पुण्यात अनेक प्रशासकीय इमारतींचे काम सुरू आहे. पोलिस आयुक्तालयासाठी १९३ कोटी रुपये, एसपी कार्यालयासाठी ६२ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

दादा नेहमीच परीक्षा घेतात : आबिटकर

आबिटकर म्हणाले, कामाची पध्दत, वेळ आणि जी गोष्ट आवडली नाही त्यावर तिथेच रिऍक्ट होतात, असे तुम्ही एकमेव राजकारणी आहात असे म्हणत अजित पवारांचे कौतुक केलं. आजही दादांनी परीक्षा घेतली की, सकाळी आठ वाजता ते आले. दादा नेहमी आमच्या परीक्षा घेतात आणि आमची अडचण होते.
राज्याची आरोग्य यंत्रणा आम्हाला सुधारायची आहे. पुणे हे आरोग्य विभागाचं दुसर सेंटर आहे. अनेक योजनाची अंमलबजावणी पुण्यातून होते. कामकाज होत होते. पण एकत्रित कार्यालय नसल्याने अडचणी येत होत्या, म्हणून हे नवे भवन आज उभारत आहोत. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे ४३ रुग्णालये सुरू करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने रुग्णालयांमध्ये स्वच्छता, आहार आणि रुग्णालयात वापरल्या जाणाऱया वस्त्रांची स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे राज्यातील ८ परिमंडळातील ५९३ आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. पुणे येथे रेण्वीय निदान प्रयोगशाळा उभारणार असल्याची घोषणा आबिटकर यांनी यावेळी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pune News : पुण्यात १०० हून अधिक पाकिस्तानी नागरिक

0
पुणे (प्रतिनिधी) पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सध्या एकूण १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. ५६ महिला आणि ३५ पुरुष दीर्घकालीन व्हिसावर भारतात आले आहेत, अशी माहिती...