Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar-Eknath Shinde: पर मैं तो रुकनेवाला नहीं, मी तर शपथ घेणारच...

Ajit Pawar-Eknath Shinde: पर मैं तो रुकनेवाला नहीं, मी तर शपथ घेणारच आहे..; अजित पवारांची पत्रकार परिषदेत तुफान बॅटींग

मुंबई | Mumbai
भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. आज भाजपा विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत सर्वांच्या सहमतीने फडणवीस यांची विधीमंडळ गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे. तसेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस राजभवनावर गेले. तेथे त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर राजभवनात तिन्ही नेतेमंडळींची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात धमाल संवाद रंगला.

मुख्यमंत्र्यांसह तुम्हीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी म्हटले की, देवेंद्र फडणवीसांनी यावर भाष्य केलेय…संध्याकाळपर्यंत थांबा तुम्हाला सगळे कळेल. त्यावर अजित पवारांनी म्हटले की, संध्याकाळपर्यंत त्यांचा समन्वय येईल, पर मैं तो रुकनेवाला नहीं, मी तर शपथ घेणारच आहे.. अजित पवारांच्या या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंनी म्हटले की, दादांना अनुभव आहे..सकाळी आणि संध्याकाळीही शपथ घेण्याचा… त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये एकच हशा पिकला.

- Advertisement -

अजित पवार नेमके काय म्हणाले?
पत्रकारांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले की उद्या देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तुम्ही आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहात का? यावर एकनाथ शिंदे म्हणाले, थोडे थांबा, संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तर, अजित पवार म्हणाले, थोडी कळ काढा, त्यांचे संध्याकाळी समजेल, मी तर उद्या शपथ घेणार आहे. मी थांबणार नाही. अजित पवारांच्या या वक्तव्यावर शिंदे यांनी एक मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, अजितदादांना अनुभव आहे. त्यांना संध्याकाळी शपथ घेण्याचा, त्याचबरोबर सकाळी शपथ घेण्याचा देखील अनुभव आहे. शिंदेंच्या या टिप्पणीवर अजित पवार कुरघोडी करत म्हणाले, मागच्या वेळी आम्ही दोघांनी (मी व देवेंद्र फडणवीस) सकाळी शपथ घेतली होती. परंतु, त्यावेळी सरकार चालवायचे राहिले होते. यावेळी पुढच्या पाच वर्षांसाठी सरकार चालवणार आहोत.

फडणवीस काय म्हणाले?
फडणवीस म्हणाले, उद्याचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. किती मंत्री शपथ घेणार या संदर्भात संध्याकाळी माहिती देऊ. आम्ही एकत्रीतपणे निर्णय घेणार आहोत. एकनाथ शिंदे यांची मी काल भेट घेतली आणि त्यांनी या मंत्रीमंडळात राहावे अशी विनंती केली. तेही सकारात्मकता दाखवतील याची मला खात्री आहे. जी आश्वासन दिली आहे ती पूर्ण करु.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंनाही तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी म्हटले की, अडीच वर्षांपूर्वी याच ठिकाणी मी मुख्यमंत्री व्हावे ही शिफारस देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे यासाठी मी शिफारस केली आहे. देवेंद्रजींनीही आता सांगितले..संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळे कळेलच…

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...