Thursday, January 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar : लाडकी बहीण योजना बंद होणार? अजित पवार स्पष्टच बोलले,...

Ajit Pawar : लाडकी बहीण योजना बंद होणार? अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले…

मुंबई | Mumbai

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे महाराष्ट्रातील (Maharashtra) महिलांचे लाडकी बहीण योजनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महिलांनी महायुतीला (Mahayuti) पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कुणाच्या वाट्याला किती जागा?

YouTube video player

अजित पवारांनी म्हटले आहे की, ” लाडकी बहीण योजनेने (Ladki Bahin Yojana) महिलांना (Woman) स्वावलंबी बनवून सक्षम केले आहे. या योजनेमुळे लाडक्या बहिणींना स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यास मदत झाली आहे. आधी या योजनेच्या व्यवहार्यतेवर आणि नंतर त्याच्या अंमलबजावणीवर विरोधकांनी सातत्याने विरोध केला आणि ही योजना अंमलात आल्यानंतर आता पैसे येत असले तरी निवडणुकीनंतर (Election) ही योजना बंद केली जाईल”, असे विरोधक पसरवत आहेत,असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : नाशकात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता लवकरच ‘तुतारी’ फुंकणार

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “महिलांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांचा वापर केला आहे. दुसऱ्या एका घटनेत एका महिलेने दोन महिन्यांचा हप्ता आणि स्वत:च्या बचतीतून शिवणयंत्र विकत घेतले आहे. राज्यभरात अशा अनेक महिलांच्या यशोगाथा समोर येत असल्याचे अजित पवार यांनी अधोरेखित केले. तसेच अडीच कोटींहून अधिक महिलांना पाच महिन्यांचा एकूण ७५०० रुपयांचा हप्ता मिळाला आहे”, अशी माहितीही त्यांनी दिली.

हे देखील वाचा : Ajit Pawar : त्र्यंबकेश्वरमधून अजित पवारांकडून हिरामण खोसकरांच्या उमेदवारीची अप्रत्यक्षपणे घोषणा; म्हणाले…

राज्याचे अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आणि ४६ हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली. या योजनेअंतर्गत सरकार महिलांना १५०० रुपये देते. विरोधी पक्षातील अनेकांनी ही योजना बंद केल्याचा दावा केला असला तरी तुम्ही माझ्या मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची मी शपथ घेतो, मी ही योजना कधीही बंद होऊ देणार नाही, असे अजित पवार म्हणाले. तसेच निवडणुकीनंतर महायुती सरकारकडून योजनेच्या निधीत वाढ करण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : ठाकरेंच्या शिवसेनेचे ३२ उमेदवार जवळपास निश्चित; संभाव्य यादी आली समोर

दरम्यान, महिलांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानत अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील माझ्या बहिणी आगामी निवडणुकीत ही योजना संपवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देतील. तसेच महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मतदार करतील, असा आशावादही त्यांनी बोलतांना व्यक्त केला. ‘

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन; वयाच्या ८३...

0
मुंबई | Mumbai ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ (Madhav Gadgil) यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी पुण्यातील डॉ....