Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar : महायुतीतील 'वाचाळवीरांची' अजित पवार करणार दिल्लीत तक्रार?; महायुतीत 'ठिणगी'...

Ajit Pawar : महायुतीतील ‘वाचाळवीरांची’ अजित पवार करणार दिल्लीत तक्रार?; महायुतीत ‘ठिणगी’ पडण्याची शक्यता

मुंबई | Mumbai
राज्यात सध्या विधान सभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. अवघ्या काही महिन्यांवर निवडणुका आलेल्या असतानाच महायुतीत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपच्या कट्टर हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या नेत्यांकडून मुस्लीम समाजाविषयी करण्यात येत असलेल्या वक्तव्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अजित पवार गटाने आक्रमक भुमिका घेतली असून भाजपच्या वादग्रस्त तसेज धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांची दिल्लीत तक्रार केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील अनेक नेते हे हिंदु-मुस्लीम धर्माबाबत वादग्रस्त विधान करत असून यामुळे दोन्ही समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वादग्रस्त विधानांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मुळ मतदार आहे तो अल्पसंख्यांक आहे. अजित पवार आपल्या भाषणांमधून वारंवार आपण अल्पसंख्यांक समुदायाच्या बाजूने आहोत असा विश्वास देत असतात.

परंतू, गेल्या काही दिवसांपासून भाजपा, आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून हिंदु-मुस्लीम समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करत आहे. त्यात प्रामुख्याने भाजपाकडून आमदार नितेश राणे, शिंदे गटाकडून संजय गायकवाड, संजय शिरसाट खासदार अनिल बोंडे हे नेते आघाडीवर आहे. मुळे भाजप नेत्यांच्या मुस्लीम समाजाविषयीच्या वक्तव्यांबाबत अजित पवार यांची भूमिका काय, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे.

दिल्लीत वरीष्ठांकडे तक्रार करणार?
या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा करुन ही बाब त्यांच्या कानावर घालणार आहेत. भाजप नेत्यांच्या वक्तव्यांकडे लक्ष द्यावे, असे अजितदादा गटाकडून सांगितले जाणार आहे. महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या या बेताल वक्तव्यामुळे विरोधकांना आयते कोलित मिळत असून नागरिकही संताप व्यक्त करत आहेत. शिंदे गट तसेच भाजपाच्या वादग्रस्त आणि धार्मिक तेढ वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची अजित पवार गट थेट दिल्ली हायकमांडकडे तक्रार करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

याबाबत अजित गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी असून प्रफुल पटेल, सुनिल तटकरे थेट दिल्लीत नेत्यांसोबत याबाबत बोलणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या