Friday, April 25, 2025
Homeराजकीय"मी साहेबांना दैवत मानलं आणि त्यांनी…"; शरद पवारांनी केलेली नक्कल अजितदादांच्या जिव्हारी

“मी साहेबांना दैवत मानलं आणि त्यांनी…”; शरद पवारांनी केलेली नक्कल अजितदादांच्या जिव्हारी

मुंबई । Mumbai

शरद पवार गटाचे बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या रडण्याची नक्कल केली. शरद पवारांनी अजित पवारांची केलेल्या नक्कलेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र शरद पवारांनी केलेली नक्कल अजित पवारांच्या जिव्हारी लागली आहे. एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

अजित पवार म्हणाले, शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहे. प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे प्रगल्भ नेत्याने माझ्यासारख्या मुलाप्रमाणे असलेल्या माझी नक्कल करणे, साहेबांनी नक्कल करणे अनेकांना आवडलं नाही. युगेंद्र पवारांनी किंवा इतरांनी केलं असतं तर ठीक होतं, असं अजित पवारांनी सांगितले. इतके दिवस वाटत होतं राज ठाकरेच नक्कल करतात, पण काल साहेब ही दिसले, असं अजित पवार म्हणाले.तसेच, मी शरद पवार साहेबांना देव मानलं. त्यांनी माझी नक्कल केली. मी घरचा मुलगा होतो. माझी नक्कल त्यांनी करणे योग्य नव्हतं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

नेमकं काय घडलं?

अजित पवार यांची काल बारामतीमध्ये सभा झाली होती. त्यावेळी पवार घराण्यातील फुटीबाबत बोलताना अजित पवार भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली. शरद पवारांच्या या कृतीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शरद पवार यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...