Thursday, September 19, 2024
HomeराजकीयAjit Pawar : "बारामतीला मी सोडून दुसरा आमदार मिळायला हवा, मग तुम्हाला…";...

Ajit Pawar : “बारामतीला मी सोडून दुसरा आमदार मिळायला हवा, मग तुम्हाला…”; अजित पवारांचं सूचक विधान

बारामती | Baramati

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा सध्या सुरू आहे. आज अजित पवारांनी बारामतीमधील एका मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत सूचक विधान केलं आहे. त्यामुळे बारामतीतून निवडणूक लढणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता मीही ६५ वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. जिथे पिकतं, तिथे विकत नसतं. एकदा बारामतीकरांना कुणीतरी मी सोडून आमदार मिळायला हवा. मग तुम्ही ९१ ते २०२४ च्या माझ्या कारकि‍र्दीची आणि त्या नव्या माणसाच्या कारकि‍र्दीची तुलना करा. असं अजित पवार म्हणाले. मात्र आम्हाला दादाच पाहिजेत अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोरच सुरु केली.

हे देखील वाचा :  ममतांना मोठा धक्का! ‘तृणमूल’वर गंभीर आरोप करत खासदाराचा राजीनामा

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मी कधी वेगळी भूमिका घेतली नाही. तरी निवडणुकीच्या वेळी काय झालं तुम्ही बघा. काहीजण बेताल वक्तव्य करतात. पण अशा वक्तव्यांचं कधीच आम्ही समर्थन केलं नाही. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारानं एक विधान केलं त्याचाही आम्ही निषेधच केला. सगळ्यांना मतं मांडण्याचा अधिकार घटनेनं दिला आहे.

कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या मनाने सर्वांना सोबत घेऊन काम केले पाहिजे. काहींचे राजीनामे घेतले. त्यांनीही लक्ष दिले पाहिजे. पद असेल तर काम करेल, नाही तर नाही करणार, अशी भूमिका घेऊ नका. काही चूकत असेल तर मला सांगा. गावातील वरिष्ठ आणि वडिलधाऱ्या मंडळींना भेटलं पाहिजे. त्यांचा आदर ठेवा, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

हे देखील वाचा :  उच्चभ्रू साेसायटीतील देहव्यापार प्रकरण; दलाल महिलेचा भागीदार…

- Advertisment -

ताज्या बातम्या