पुणे | Pune
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नव्या २० दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असेच एक मजेदार भाष्य केले आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र सध्या अजित पवार यांनी असेच एक मजेदार भाष्य केले आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करून मोठे मिश्किल विधान केलेय.
मुंबईत गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा एक पुस्तक लिहायचा सल्ला देणार असल्याचे अजित पवार म्हणाले. अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडवणीसांना एक पुस्तक लिहायला सांगणार आहे. फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना एक पुस्तक लिहिले आहे. आता मी त्यांना पुन्हा एकदा एक पुस्तक लिहायला सांगणार आहे.त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे त्याचे नाव द्यायला सांगणार आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘ऐकलत का?’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी काही जुने किस्से सांगितले. त्यात त्यांनी ‘मी पुन्हा येईन’ या फडणवीसांच्या घोषणेचाही उल्लेख केला.
दरम्यान, २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारुपाला आला होता. मात्र सर्वांत मोठा पक्ष असूनही भाजपाला सत्ता स्थापन करता आली नव्हती. ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. त्यानंतर फडणवीस यांना विरोधी बाकावर बसावे लागले. याच काळात विरोधी पक्षात असताना त्यांनी विधिमंडळात भाषण करताना, वेगवेगळ्या कार्यक्रमांत तसेच निवडणुकीत प्रचार करताना ‘मी पुन्हा येईन’ हे विधान अनेकदा केले होते. त्यांचे हेच विधान नंतर चांगलेच गाजले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा