Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar-Ajit Pawar : काका-पुतण्या एकत्र यावेत! अजित पवार यांच्या आईचं विठुरायाकडे...

Sharad Pawar-Ajit Pawar : काका-पुतण्या एकत्र यावेत! अजित पवार यांच्या आईचं विठुरायाकडे साकडं

पंढरपूर । Pandharpur

पवार कुटुंबांमध्ये जो काही वाद आहे, तो वाद संपू दे आणि पुन्हा सर्व पवार एकत्र येऊ देत, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी विठुराया चरणी केली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी विठुरायाचे आणि रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय कटुता सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक; बारामतीमधून पवार विरुद्ध पवार, असा सामना रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले. पवार कुटुंबांनी एकत्र यावे यासाठी आता पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या मातोश्रींनी पांडुरंगाचे दर्शन घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. लोकसभा निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात लढल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळालं आहे. या निकालानंतर राष्ट्रवादीमधील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...