Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar : अजित पवारांना मोठा दिलासा! आयकर विभागानं मुक्त केली जप्त...

Ajit Pawar : अजित पवारांना मोठा दिलासा! आयकर विभागानं मुक्त केली जप्त मालमत्ता

मुंबई । Mumbai

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह त्यांच्या कुटुंबीयांना दिल्लीतील ट्रिब्यूनल कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने आयकर विभागाला जित पवारांची जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

त्याचबरोबर पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित मालमत्ताही कोर्टाने मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. महत्वाची बाब म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांना दुसऱ्याच दिवशी मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.

कोणत्या मालमत्ता मुक्त करण्यात आल्या?

  • नरिमन पॉइंट, मुंबई येथील निर्मल टॉवरमधील व्यावसायिक जागा ज्याची अंदाजे किंमत जवळपास 300-400 कोटी रुपये आहेत.
  • पुण्यातील बारामतीसह इतर काही ठिकाणच्या काही जमिनी आहेत, ज्याची किंमत 200-300 कोटी रुपये आहे.
  • विविध शहरांमध्ये गोदामे आणि व्यावसायिक मालमत्ता आहेत ज्याची किंमत 150-200 कोटी रुपये आहेत.
  • कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांतील इतर ठिकाणी शेतीसाठी आणि व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनी आहेत, ज्याची किंमत अंदाजे 100 कोटींच्या घरात आहे.

अजित पवारांना न्यायालयाने एकीकडे दिलासा दिला आहे तर दुसरीकडे त्यांच्यावर आणि सरकारवर आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे. शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. अंधारे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आयकर विभागाने जप्त केलेली अजित पवारांची मालमत्ता सहीसलामत दादांना परत केली! लोकशाही बळकट करण्यासाठी अजित पवारांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे! लोकशाही बळकटीकरणाचा हा खडतर लढा भावना गवळी, यशवंत जाधव, रवींद्र वायकर, राहुल कनालसह काही चित्रविचित्र लोकांनीसुद्धा मोठ्या हिमतीने लढला होता!

सुषमा अंधारे यांनी एक्सवर एक व्हिडीओ देखील जारी केला आहे. या व्हिडीओत त्यांनी म्हटलं आहे की, कालच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि आज लगेचच अजित पवारांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सहीसलामत त्यांना परत केली. खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अजित पवारांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झालेलं आहे. हा लोकशाही बळकटीकरणाचा, महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा याच्याआधी सुद्धा लढवला गेला आहे. भावना गवळी, यशवंत जाधव, रवींद्र वायकर, राहुल कनालसह काही चित्रविचित्र लोकांनीसुद्धा मोठ्या हिंमतीने हा लढा दिला होता! या शूरवीरांनी मोठ्या ताकदीने हा पराक्रम बजावला होता. त्या सगळ्या शूरवीरांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सगळ्या स्वायत्त यंत्रणांना सगळे नियम बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून हे निकाल लावायला मदत केली त्या भारतीय जनता पार्टीचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार सुद्धा.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...