Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar: मी कोणालाही भेटायला गेलेलो नव्हतो…; दिल्लीवारीबद्दल अजित पवारांचा मोठा खुलासा

Ajit Pawar: मी कोणालाही भेटायला गेलेलो नव्हतो…; दिल्लीवारीबद्दल अजित पवारांचा मोठा खुलासा

मुंबई | Mumbai
महायुतीच्या नेत्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सत्तेस्थापनाचा दावा केला आहे. महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सामील होणार का, याबाबत सस्पेन्स कायम आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर राज्यपालांनी गुरुवारी ५ डिसेंबरला संध्याकाळी ५.३० वाजता शपथविधी घेण्याची परवानगी दिली. राज्यपालांच्या भेटीनंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी दिल्लीवारीसंदर्भात मोठा खुलासा केला.

दिल्लीवारी बद्दल अजित पवार काय म्हणाले?
राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीतील तिन्ही पक्षातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मी फक्त एक खुलासा करू इच्छितो. मी माझ्या वेगळ्या काम करिता दिल्लीला गेलो होतो. मी कोणालाही भेटायला गेलेलो नव्हतो. माझ्या बाबतच्या अनेक बातम्या चालवल्या गेल्या. मी कोणाला भेटायला गेलेलो नव्हतो. त्यामुळे भेट नाकारायचा प्रश्नच येत नाही. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेलो होतो, असे म्हणत अजित पवारांनी दिल्ली वारीवर खुलासा केला आहे.

- Advertisement -

यावेळी अजित पवार यांनी एक महत्त्वाची बातमी सांगितली. ते म्हणाले की, या सगळ्यांनी माझी पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. त्यांना ११ जनपथ इथे बंगला मिळाला आहे. माझे घर असू द्या किंवा सरकारचे घर, मला ते नीटनीटके लागते, हे सगळ्यांना माहितीये. म्हणून मी तिथे आर्किटेक्टला घेऊन काय नियमामध्ये गोष्टी करता येतील, ते पाहण्यासाठी गेलो होतो.

त्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि माझ्यावर ज्या काही खटले सुरु आहेत. त्याबद्दल मी कधी वकिलांना भेटलो नव्हतो. दिल्लीतील सर्व जबाबदारी प्रफुल्ल पटेल पार पाडत असतात. काल (३ डिसेंबर) ला पक्षाचा चिन्हाची तारीख होती, ती पुढे ढकली होती. तो विषय एकदा संपवावा. आमचा सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरु आहे. सुप्रीम कोर्ट सर्वांची बाजू ऐकून योग्य निर्णय देईल. पण इथल्या कामामुळे मला कधीच वकिलांना भेटता आले नाही. त्यांनाही भेटणे अतिशय महत्त्वाचे होते. म्हणून मी दिल्लीला गेलो होतो. तसेच जवळच्या नातेवाईकाचे लग्न होते. या तीन गोष्टींकरीता मी दिल्लीला गेलो होतो, असे अजित पवार म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...