Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Andolan : "... तर आम्ही सगळं ऐकून घेऊ"; विरोधकांच्या 'त्या' वक्तव्यावर...

Maratha Andolan : “… तर आम्ही सगळं ऐकून घेऊ”; विरोधकांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांचे उत्तर

मुंबई | Mumbai

जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंतवरली सराटी गावामध्ये (Antwarli Sarati Village) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण (Hunger Strike) करत असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी (Police) शुक्रवार (दि.०१ सप्टेंबर) रोजी लाठीचार्ज केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे आंदोलकांनी (Protester) आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक केली होती. यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. यामध्ये काही आंदोलक आणि पोलीस जखमी झाले होते…

- Advertisement -

Video : ‘बम बम भोले’च्या जयघोषाने दुमदुमली त्र्यंबकनगरी

त्यानंतर या घटनेचे पडसाद राज्यभर उमटतांना पाहायला मिळत असून सकल मराठा समाजाकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन आणि मोर्चे काढले जात आहे. तसेच या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता या घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जालन्यात (Jalna) घडलेल्या घटनेवर भाष्य केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना गृहमंत्रालयाकडून आदेश आलेले असू शकतात, या विरोधकांच्या वक्तव्यावर उत्तर दिले.

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह झाला ‘बाबा’; मुलाचे ठेवले ‘हे’ नाव

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी उदयनराजे, गिरीश महाजन गेले होते. त्यासंबंधीचा तोडगा निघणार आहे. पोलिसांनी मराठा आंदोलकांवर जो लाठी हल्ला केला त्यासंदर्भात राजकारण केले जात आहे. वरुन आदेश आले, असं काहीजण बोलत आहेत. विरोधकांनी वरुन आदेश आल्याचे सिद्ध केले तर आम्ही त्यांचे सगळे ऐकून घेऊ. आता शांततेची आणि आंदोलन थांबण्याची गरज आहे, असे पवार यांनी म्हटले.

Asia Cup 2023 : भारत आज नेपाळशी भिडणार; सामन्यावर पावसाचं सावट, भारतासमोर ‘करो या मरो’ची स्थिती

पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, दोन दिवस मी आजारी होतो म्हणून बाहेर पडू शकलो नाही. जालन्यात जे झाले ते व्हायला नको होतं, आरक्षण ही सगळ्यांचीच मागणी आहे. काही लोक या मुद्द्यावर राजकीय पोळी भाजत आहेत. अनेक समाज आरक्षणाची मगणी करतात पण ते कायद्याच्या कसोटीत बसायला हवं. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते. परंतु, सुप्रीम कोर्टात ते टिकले नाही. कोणत्या कारणाने ते टिकले नाही याचा अभ्यास गरजेचा आहे. आजच्या बैठकीमध्ये त्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या