पुणे | pune
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार आज होमग्राऊंड म्हणजेच बारामतीमध्ये आहेत. आपल्या जनसन्मान यात्रेनिमित्त ते बारामतीमधील लाडक्या बहिणींशी संवाद साधताना अजित पवारांनी त्यांच्या बहिण आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. सकाळी दूधवालाही उठतो अशी बोचरी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यावरुन अजित पवार यांनी पलटवार केला आहे. अजित पवार म्हणाले की, काहीजण म्हणतात सकाळी दूधवाला पण उठतो, पण आम्ही कुठं म्हणलो की दुधवाला दुपारी उठतो, असे म्हणत प्रत्त्युतर दिलेय.
अजित पवार म्हणाले, “वैयक्तिक स्वरुपाची टीका टिप्पणी… तो काय म्हणाला, त्यावर मी काय बोलणार? मग मी मत व्यक्त करणार. यात वेळ वाया घालवू नका. केवळ राजकीय स्वरुपाच्या टीका टिप्पणी टाळून विकासावरच बोलायचे असे मी ठरवले आहे. जसे मी ठरवले आहे, तसे कार्यकर्त्यांनी ठरवायचे आहे.
आपल्या अंगाला भोकं पडत नाही…
“इतरजण काही काही बोलत आहेत. बोलू द्या. आपल्या अंगाला भोकं पडत नाही. काहीजण सांगतात सकाळी कोण उठा म्हणते? आम्ही कुठे म्हटले की तुम्ही उठा म्हणताहेत. कोण म्हणतो दुधवालाही सकाळी उठतो. उठतो ना, मी कधी म्हटले की दूधवाला दुपारी उठतो. मी म्हटलोच नाही. या गोष्टीला महत्त्व देऊ नका. माझी कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे”, असे आवाहन अजित पवारांनी केले.
हिंमत असेल तर समोर या ना
‘आता काहींनी जोडे मारो आंदोलन केले. आमच्या फोटोला जोडे मारलेत, अरे कसे जोडे मारतात. हिंमत असेल तर समोर या ना. कुठल्या सरकारला असे वाटणार पुतळा पडावा म्हणून. निवडणूकीच्या काळात संविधान बदलणार असा चुकीचा प्रचार केला. मला तुम्ही पाच वर्ष निवडून दिले आहे. पुढे काय करायचे ते तुम्ही ठरवा, मी केलेल्या कामाचे पुस्तक काढून तुम्हाला देणार आहे.’ असे ही अजित पवार म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा