Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजअन् मला मुख्यमंत्री करा…; अजित पवारांनी अमित शाहांकडे केली इच्छा व्यक्त?

अन् मला मुख्यमंत्री करा…; अजित पवारांनी अमित शाहांकडे केली इच्छा व्यक्त?

मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुध्द महाविकास आघाडी असा प्रामुख्याने सामना रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत हा प्रस्ताव मांडल्याचे समोर आले आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ही माहिती समोर आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते. राज्य भाजपच्या कोअर कमिटीमधील वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांनी रविवारी रात्री निवडणुकीची तयारी आणि जागा वाटपासंबंधी चर्चा केली. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाताना घ्यावयाची काळजी आणि निवडणूक रणनीतीसंबंधी सूचना करून त्यांनी भाजप नेत्यांशी चर्चा केली.

- Advertisement -

अमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना अजित पवार अनुपस्थित होते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते. अशातच एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शाह दिल्लीकडे रवाना होण्याआधी मुंबई विमानतळावर त्यांची भेट घेतली. यावेळी अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात मुंबई विमानतळावरच बैठक पार पडली.

बैठकीत अजित पवार यांनी महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे केली. मला मुख्यमंत्री करा, अशी इच्छा अजित पवार यांनी अमित शहांकडे उघडपणे बोलून दाखवली. त्यासाठी अजितदादांनी बिहार पॅटर्नचा दाखलाही दिला.

महायुतीनं विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझं नाव घोषित करावे, असे सांगितल्याची माहिती आहे. त्यांच्या या मागणीमुळे शिवसेना शिंदे गटातील नेते नाराज झाल्याची माहिती आहे. दरम्यान अजित पवार यांच्या या मागणीला अमित शहा नेमका काय प्रतिसाद देणार? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...