Saturday, April 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजअजित पवारांनी बोलून दाखवली मनातील खंत; म्हणाले, मी शरद पवारांचा मुलगा असतो...

अजित पवारांनी बोलून दाखवली मनातील खंत; म्हणाले, मी शरद पवारांचा मुलगा असतो तर…

मुंबई | Mumbai

गेल्या वर्षी जुलै २०२३ मध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीमध्ये (Mahayuti) जाण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP)फूट पडली. या फुटीनंतर राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह देखील निवडणूक आयोगाने (Election Commission) सदस्य संख्येच्या आधारावर अजित पवारांना दिले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात (Maharashtra) काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पाहायला मिळत आहे. सध्या देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असल्याने दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका प्रचारसभेत बोलतांना आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी काढली थेट तडीपारीची नोटीस

यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, “शरद पवार (Sharad Pawar) हे आमचे दैवत आहेत, पण प्रत्येकाचा काळ असतो. ८० वर्षांच्या पुढे गेल्यावर नव्या लोकांनाही संधी द्यायला हवी. मी आता ६० च्या पुढे गेलो आहे. आम्हाला कधीतरी संधी आहे की नाही? मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. पण मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही. दिवसरात्र सगळा जिल्हा सांभाळला. शरद पवारांकडे जिल्हा बँक नव्हती. जिल्हा बँक इतरांच्या हाती असायची. मी राजकारणात आल्यापासून आजपर्यंत ताब्यात ठेवली आहे. तसेच जिल्हा परिषद देखील ताब्यात ठेवली आहे. मी कधीही कुणाला वाऱ्यावर सोडत नाही, असे पवार यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘त्या’ युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

पुढे बोलतांना अजित पवारांनी म्हटले की, “आम्ही मधल्या काळात वेगळा निर्णय घेतला. शरद पवारांना आम्ही सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही आता आराम करा. तुमचं वय ८४ झालं आहे आम्ही चांगलं काम करु असा विश्वास त्यांना दिला. आम्ही सगळेजण योग्य प्रकारे चांगला कारभार करणारी माणसं आहोत. संकटं आल्यावर कसा आधार द्यायचा ते आम्हाला माहीत आहे. मला साहेबांनी (शरद पवार) सांगितलं ठीक आहे अजित आता मी राजीनामा देतो कारण मलाही हे कुणावर तरी सोपवायचं आहे. मी म्हटलं बघा तुमचा निर्णय आहे, असंही अजित पवार म्हणाले. तसेच भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवारांनी ६ बैठका देखील घेतल्या होत्या. त्यामुळे आम्ही माघारी न फिरता भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असे देखील अजित पवारांनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik News : माजी आयपीएस सासऱ्याला सुनेची धमकी; मागितली वीस लाखांची खंडणी

सुप्रिया सुळेंचे अजित पवारांना प्रत्युत्तर

अजित पवारांनी केलेल्या विधानावर बोलतांना शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, “मला त्यांचा स्वभाव माहीत आहे. तुम्हीच तुलना करा ना? कोणाला काय मिळालं याचा हिशोब करा. मला काय मिळालं आणि दादांना काय मिळालं. सगळं तुमच्या समोर आहे. सगळे स्पष्ट होईल. खूप सोप्प उत्तर आहे,” असे म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अमित

गृहमंत्री अमित शहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना आदेश; महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांबाबत धक्कादायक माहिती...

0
मुंबई | Mumbai जम्मू-काश्मीरमधील पहलगाम मधल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान काश्मीर...