Saturday, November 16, 2024
HomeराजकीयAjit Pawar : अजित पवारांनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले, "आरोप-प्रत्यारोप करताना…"

Ajit Pawar : अजित पवारांनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले, “आरोप-प्रत्यारोप करताना…”

मुंबई | Mumbai

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकालाचा गुलाल उधळला जाणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

- Advertisement -

याचदरम्यान आज महायुतीची महत्वाची पत्रकार परिषद पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही महत्वाची पत्रकार परीषद पार पडली. यावेळी अजित पवार यांनी विरोधकांना फटकारले आहे.

अजित पवार म्हणाले, आमच्या समोरच्या लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. आमचे महायुतीचे २०२२ ते २०२४ चे रिपोर्ट कार्ड देत आहोत. यांनी तिजोरी मोकळी केली असे काहींनी आरोप केले. शेवटच्या अर्थसंकल्पमध्ये काही तरतुदी केल्यात त्यावर टिंगल टवाळी केली. लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली.

काही तरी बोलायचं आणि जनतेमध्ये संभ्रम पसरवायचं. सुटसुटीत दोन पानांचं हे रिपोर्ट काढले आहे. हा बदलाचा अहवाल आहे. आमच्या मेहनतीचा हा लेखाजोखा आहे. आमचे विरोधक थोडे गडबडले आहेत. घाबरलेत असं म्हणणार नाही, पण गडबडले आहेत. तसेच आरोप प्रत्यारोप करताना विरोधकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे, अशा शब्दांत अजित पवार यांनी विरोधकांना फटकारलं आहे.

तसेच यावेळीअजित पवार यांनी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत पाच महिन्यांत महिलांना पैसे देण्यात आले आहेत. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लाडक्या बहि‍णींच्या आयुष्यातील सकारात्मक बदल विरोधकांच्या पचनी पडत नाही.

मी जबाबदारीने सांगतो की, लाडकी बहीण योजनेसाठी आधी १० हजार कोटी नंतर ३५ हजार कोटींची तरतूद केली आहे. ही योजना तात्पुरती नाही. हे पैसे तुमचा अधिकार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ करण्याचं सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्याबद्दल आम्ही विचार करत आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या