Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar: "चहा विक्रेत्याने डब्यात आग लागल्याची आरडाओरड केली अन्…"; अजित पवारांनी...

Ajit Pawar: “चहा विक्रेत्याने डब्यात आग लागल्याची आरडाओरड केली अन्…”; अजित पवारांनी सांगितलं जळगाव रेल्वे अपघाताचे कारण

मुंबई | Mumbai
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ २२ जानेवारी रोजी मोठा रेल्वे अपघात घडला. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना चिरडले. या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान हा अपघात घडला कसा? या अपघातासाठी कोण जबाबदार? याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

काय म्हणाले अजित पवार?
“जळगावमध्ये रेल्वे अपघाताची घटना घडल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थाळी पोहोचून मदतकार्य केले. ही घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेची माहिती आम्ही घेतली. माहिती घेतल्यानंतर असे लक्षात आले की, रेल्वेच्या पँट्रीतील एका चहा विक्रेत्याने डब्यात आग लागली म्हणून आरडाओरड केली. आग लागली या भितीने त्या पूर्ण डब्यात गोंधळ उडाला. तो गोंधळ पाहून शेजारच्या दुसऱ्या डब्यातही मोठा गोंधळ निर्माण झाला, तेव्हा काही प्रवाशांनी घाबरून स्वत:चा जीव वाचावा म्हणून रेल्वेतून खाली उड्या मारल्या”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

- Advertisement -

“तसेच रेल्वे वेगाने असल्यामुळे काही प्रवाशांना उतरता आले नाही. त्यामुळे कोणीतरी रेल्वेची साखळी ओढली. त्यामुळे रेल्वे थांबली आणि प्रवाशी खाली उतरले. मात्र, त्याचवेळी दुसऱ्या शेजारच्या रेल्वे ट्रॅकवरून कर्नाटक एक्स्प्रेस अतिशय वेगाने आली आणि रुळावरील प्रवाशांना चिरडले. त्यानंतर ती गाडी पुढे काही अंतरावर जाऊन थांबली. या घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील १० लोकांची ओळख पटलेली आहे. अद्याप तीन लोकांची ओळख पटलेली नाही. तसेच ही घटना निव्वळ अफवांमुळे घडलेली आहे”, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली.

नेमकी घटना काय आहे?
ळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी भीषण दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागण्याच्या भीतीने प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या होत्या. मात्र त्याचवेळी भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेकांना उडवले. या भीषण अपघातात आतापर्यंत १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २५ जखमी झाले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...