Tuesday, January 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar: "निवडणुका आल्या की माझ्यावर आरोपांची मालिका सुरु होते, पण त्यातून…";...

Ajit Pawar: “निवडणुका आल्या की माझ्यावर आरोपांची मालिका सुरु होते, पण त्यातून…”; अजित पवारांकडून पार्थची पाठराखण

बारामती | Baramati
पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणावरून राज्यात सुरू असलेल्या चर्चांदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत त्यांची भूमिका स्पष्ट केली. “मी आयुष्यात कधीही चुकीचं काम केलं नाही. माझ्या नावाचा वापर करून कोणावरही दबाव आणू नका. चुकीचं काम आजवर केलं नाही आणि पुढेही करणार नाही.” असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर होत असलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणावर अजित पवारांनी आज बारामतीत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांवर आपली भुमिका स्पष्ट केली.

- Advertisement -

आरोप झाले, पण त्यातून काहीच पुढे आलं नाही
अजित पवार म्हणाले की, “मधल्या काळात काही घटना घडल्या, त्याची चौकशी सुरू आहे. एका महिन्यात वस्तुस्थिती समोर येईल. एक रुपया न भरता कागद कसा तयार झाला हे पाहून मी स्वतःही आश्चर्यचकित झालो. नेमके काय झाले हे लवकरच समोर येईल. पण निवडणुका सुरू की आरोपांची मालिका सुरू होते. आधीही आमच्यावर आरोप झाले, पण त्यातून काहीच पुढे आलं नाही. मात्र बदनामी मात्र होते.”

YouTube video player

काम करुन दाखवणे हीच माझी ओळख
अजित पवार म्हणाले की, “घटनेचा आदर करायचा आहे. चुकीचं झालं तर त्यावर बोलू शकतो, पण प्रत्येक वेळी बारामतीचं नाव पुढं करून राजकारण करायची पद्धत अयोग्य आहे. मी कधीही चुकीचे केले नाही, आणि पुढेही करणार नाही.”अजित पवार यांनी शेवटी ठाम शब्दांत सांगितलं की, “राजकारणात अनेक चढ-उतार आले, पण मी समाधानी आहे. काम करून दाखवणं हीच माझी ओळख आहे, आणि राज्यात लक्ष ठेवूनच पुढचं प्रत्येक पाऊल उचलणार आहे.”

माझ्याविरोधात ७० हजार कोटींचा आरोप झाला
मुख्यमंत्र्यांनी चांगले अधिकारी चौकशी समितीत घेतले आहेत, त्यामुळे महिन्याभरात वस्तूस्थिती समोर येईल. निवडणुका सुरू झाल्या की आमच्यावर आरोप सुरु होतात. कुठूनतरी, काहीतरी असे काहीतरी बाहेर आणले जाते. तुम्हाला आठवत असेल तर २००८ किंवा २००९ मध्ये असेच माझ्याविरोधात ७० हजार कोटींचा आरोप झाला. त्याला १५ ते १६ वर्षे लोटली. त्यातून कुणीही काहीही पुरावे देऊ शकले नाही. पण आमची बदनामी झाली. आता तर मीडियात प्रत्येक पक्षाचे प्रवक्ते आहेत. तेही बोलतात. चुकीची कुणी काही केलं आणि त्याबद्दल बोललं तर समजू शकतो. पण सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांची कामं करायची. पारदर्शकता कशी राहिल ते बघायचं. नियमाला धरून सगळं करायचं. घटनेच्या चौकटीत राहून काम करायंच. चूक होणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि लगेच बारामतीतील कुठल्या कुठल्या जमिनीचं काहीही काढायला लागले.

मी बारामतीसह राज्यभर लक्ष ठेवून
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, “सोमवार ते शुक्रवार आम्ही राज्याचा आढावा घेतला. बारामतीत चाचपणी केली. बारामती आघाडीवर लढली जायची ही परंपरा होती. पण मी सक्रिय झाल्यावर ठरवले की पक्षाच्या नावावर लढायचे. पक्षविरोधी कृती झाल्यास कारवाई करता येते.” ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात 9 वर्षांनी 288 नगरपरिषद आणि पंचायत निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर मी बारामतीसह राज्यभर लक्ष ठेवून आहे. पुढच्या पाच वर्षांत शहराचा कायापालट करायचा आहे, ही जबाबदारी माझी आहे.” उमेदवारी प्रक्रियेबाबतही त्यांनी स्पष्ट मार्गदर्शन दिलं: “ज्यांना माझ्या बाजूने फॉर्म भरायचे आहेत त्यांनी बुधवारपर्यंत फॉर्म भरू नका. गुरुवारी सकाळी मी स्वतः मुलाखती घेणार आहे. त्यानंतर एक मेळावा घेऊन प्रचाराची दिशा ठरवू.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

प्रकाश

मंत्री गिरीश महाजनांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; माधवी जाधव यांना प्रकाश...

0
नाशिक | Nashikमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव...