Saturday, May 3, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar: "मलाही वाटते मुख्यमंत्री व्हावे, पण..."; अजित दादांनी पुन्हा व्यक्त केली...

Ajit Pawar: “मलाही वाटते मुख्यमंत्री व्हावे, पण…”; अजित दादांनी पुन्हा व्यक्त केली खदखद

मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्रिपादाची इच्छा सर्वश्रृत आहे. त्यांनी आतापर्यंत उमुख्यमंत्री होण्याची हॅटट्रिक केलेली आहे. मात्र त्यांना अद्याप मुख्यमंत्री होता आलेले नाही. त्यांनी तसेच त्यांच्या पक्षातील नेतेमंडळींनी मुख्यमंत्रिपद मिळण्याबाबतची इच्छा अनेकवेळा बोलून दाखवलेली आहे.

ज्येष्ठ महिला पत्रकार राही भिडे यांनी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळावी, अशी आशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केली. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “महिला मुख्यमंत्री व्हावी असे प्रत्येकाला वाटते. पण तो योगही जुळून यावा लागतो. मलाही वाटते मुख्यमंत्री व्हावे, पण कुठे जतमंय? त्यामुळे कधी ना कधी योग येईल”, असे मिश्किलपणे म्हणत त्यांनी त्यांच्या मनातील खदखदही व्यक्त केली.

- Advertisement -

तसेच, “पण राज्याला महिला मुख्यमंत्री मिळण्याचा योग कधीतरी जुळून येईल. पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणे ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री झाल्या. हा फुले, शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे तो योगही राज्यात येईल,” सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, ताराराणी या महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. त्यांचे कर्तृत्व महाराष्ट्राने पाहिले आहे, त्यामुळे तो (महाराष्ट्रातही महिला मुख्यमंत्री होईल) दिवसही लांब असेल असे वाटत नाही.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अजित पवार सहा वेळा उपमुख्यमंत्री
अजित पवार आतापर्यंत एकूण पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. सध्याची त्यांची सहावी वेळ आहे. ते सर्व प्रथम २०१० साली काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. २०१२ साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सरकारमध्ये त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडली. नोव्हेंबर २०१९ मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यावेळी ते फक्त ८० तासांसाठी उपमुख्यमंत्रिपदी होते.

पुढे २०२२ साली महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. ते पुढे अडीच वर्षे या पदावर होते. पुढे २०२२ साली अजित पवार यांनी बंड केले आणि भाजपासोबत हातमिळवणी केली. यावेळी ते पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. आता महायुती सरकारमध्ये ते सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ambadas Danve : लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास खात्यातील पैसा वळवला, अंबादास...

0
मुंबई । Mumbai "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे. मात्र, सरकारी तिजोरीवर ताण असतानाही हप्ता दिला...