Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar: "तुमची योजना कॅापी केली अन् आमचे सरकार..."; अजित पवारांची मोठी...

Ajit Pawar: “तुमची योजना कॅापी केली अन् आमचे सरकार…”; अजित पवारांची मोठी कबुली

पुणे | Pune
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या राष्ट्रवादी (अजत पवार गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजपला मोठा फटका बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महिला आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुतीकडून मोठे प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणून मध्ये प्रदेशच्या ‘लाडली बहना’ च्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना लागू करण्यात आली. लाडकी बहीण योजना’ महायुतीसाठी गेम चेंजर ठरली आणि महायुतीला याचा मोठा फायदा झाला.

राज्य शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदान, कृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉन कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय कृषिमंत्री मा.श्री. शिवराज सिंह चौहान, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते. यांच्यासमवेत या कार्यक्रमात सहभागी झाले.

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरलेली आहे. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर अजित पवारांनी जाहीर कबुली दिली आहे. तुमची लाडकी बहीण योजना कॅापी केली आणि आमचे सरकार आले. आमचे सरकार येण्याच श्रेय तुम्हाला सुध्दा आहे, असे म्हणत अजित पवारांनी कौतुक केले.

YouTube video player

पवार म्हणाले, या विश्वासामुळे आमचे बॅलेट बॉक्स भरभरून वाहिले आणि त्याचे फलित म्हणजेच विधानसभेच्या २८८ जागांपैकी तब्बल २३६ जागांवर आमचे उमेदवार विजयी झाले. ही आजपर्यंतची सगळ्यात मोठी आणि ऐतिहासिक जीत आहे. राज्यात महायुतीचे एक बळकट सरकार स्थापन झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

अजित पवार म्हणाले, ‘महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचे जुने नाते आहे. मध्य प्रदेशातून अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांचे काम सुरू केले होते, त्यांच्या त्रीशताब्दी जयंती निमित्त शुभेच्छा…लाडकी बहीण योजना मध्यप्रदेशात सुरू करून लोकांचे मन जिंकण्यासाठीच जिंकणारी योजना आणली आहे. महायुतीला विधानसभेत मोठे यश मिळण्यामागे लाडकी बहीण योजनेचा हात आहे. आम्हाला सत्तेत आणण्याचे काही प्रमाणात श्रेय तुम्हालाही जाते. आम्हाला विजयाचा मार्ग दाखवल्याबद्दल आम्ही तुमचे मन:पूर्वक आभार मानतो

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

अत्याचार

त्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर...

0
बदलापूर | Badlapurबदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये हे कृत्य...