Thursday, April 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअजित पवारांना फोन करुन अडचणीत आणणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; Video Viral करणं पडलं...

अजित पवारांना फोन करुन अडचणीत आणणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; Video Viral करणं पडलं महागात

सोलापूर | Solapur
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यास फोनवरुन दादागिरी केली. अजित पवारांच्या या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी, ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी तक्रार दिली होती. शेतकरी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी याबाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता.

याबाबत माहिती अशी की, ज्या कार्यकर्त्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कॉलवर ‘तुम्हारी इतनी हिम्मत… मै ऍक्शन लुंगा’ असे म्हणाले होते, त्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थच अडचणीत आले आहेत. या कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कुर्डू येथील 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं दिसून आलं. त्यामध्ये, बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाणे यांच्यासह १५ ते २० ग्रामस्थांचा समावेश असून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अजित पवार आणि महिला पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडीओ झाला व्हायरल
अजित पवार आणि महिला आयपीएस अधिकारी, करमाळा तालुक्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांचा व्हॉइस कॉल आणि व्हिडीओ कॉल सध्या सोशल मीडियावर प्रचंड Viral होत आहे. अजित पवारांच्या या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि प्रसिद्धी माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?
गावातील मुरूम उपसा करताना अडवणूक केल्यानंतर येथील एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून कारवाई थांबविण्याची विनंती केली होती. त्यावेळी, अजित पवारांनीही फोनवरुन संबंधित महिला अधिकाऱ्यास कारवाई थांबवा, मी तुम्हाला आदेश देतो असे म्हणत दादागिरीची भाषा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे, अजित पवारांवर टीकेची झोड उठल्याने आता संबंधित ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कुर्डूवाडी पोलीस ठाणे गु.र.नं 371/2025 बी.एन.एस.चे कलम 303(2),3(5) व पर्यावरण संरक्षण अधिनियम 9.15 प्रमाणे फिर्यादी-प्रीती प्रकाश शिंदे वय २७ वर्ष धंदा नोकरी (ग्राम महसूल अधिकारी कुर्डू) रा. मोडनिंब ता. माढा जिल्हा सोलापूर यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यावर करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो…मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर कॉल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना.. असे रागावून अजित पवार बोलले … आणि अजित पवारांनी व्हिडीओ कॉल केला.

त्यावर कृष्णा बांधावरच जाऊन बसून पवारांशी बोलताना दिसल्या…यात अजित पवार कारवाई थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पहायला मिळत असून…माझा फोन आलाय…तहसीलदारांना सांगा असे पवार सांगतात. घटनास्थळी हा प्रकार 3 तास चालू होता. अंजली कृष्णा आणि पवारांच्या संवादाच्या क्लिप व्हायरल झाला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची बदली

0
​नाशिक | प्रतिनिधी Nashik राज्य गृह विभागाने गुरुवारी (दि. ३०) भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या...