Sunday, September 8, 2024
Homeमुख्य बातम्याम्हणून महायुती सरकारमध्ये सामील झालो...; महायुतीमधले शतक पुर्ण करताच अजित पवारांचे पत्र

म्हणून महायुती सरकारमध्ये सामील झालो…; महायुतीमधले शतक पुर्ण करताच अजित पवारांचे पत्र

मुंबई | Mumbai

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसल महायुतीसोबत (Mahayuti) सत्तेत जाऊन १०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त अजित पवार यांनी पत्र (Ajit Pawar Letter) लिहून आपली भावना मांडली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष असा उल्लेख असलेले भलेमोठे पत्र लिहले आहे. दरम्यान या पत्रामध्ये स्वत:चा उल्लेख त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला आहे. यात त्यांनी युती सरकारच्या कामकाजाचा संपुर्ण लेखाजोखा मांडलेला आहे.

- Advertisement -

अजित पवारांचे पत्र

अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श, फुले-शाहू- आंबेडकरांचे विचार आणि वंदनीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या लोककल्याणाचे धोरण यांचा वारसा जपला आहे. माझ्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील पुढील काळात हीच परंपरा कायम जपणार आहे, हे माझे तुम्हा सर्वांना वचन आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यापूर्वीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका असणारे निर्णय घेतले आहेत. अशा प्रकारचे निर्णय हे त्या त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला घ्यावे लागतात. अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष २ जुलै २०२३ रोजी महायुती सरकारमध्ये सामील झालो.

Israel Hamas War: युध्दाच्या काही तासातच हमास जमिनीवर; ‘या’ मुद्द्यावर इस्राईलसोबत चर्चा करायला तयार

वंदनीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी समाजकारण करताना मांडलेलं ‘बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व’ हे सूत्र माझी प्रेरणा आहे, हे मी अनेकदा वेगवेगळ्या मंचांवर मांडले आहे. याच भूमिकेतून महापुरुषांचा आदर्श घेत लोककल्याणासाठी हाती घेतलेला ‘वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा’ हे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे सत्तेत असण्याचे सूत्र राहणार आहे, यांची मी या पत्राद्वारे आपणास ग्वाही देऊ इच्छितो.

दरम्यान, टीका करणे हा राजकारणाचा अविभाज्य भाग बनला आहे. मी सकारात्मक टीकेचे नेहमीच स्वागत केलय. मात्र, केवळ टीका करण्यासाठी, राजकीय हेतूने टीका करणे हा माझा प्रांत नाही. मी सकारात्मक कामावर आणि विकासात्मक राजकारणावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे. लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा पिंड आहे, असे म्हणत अजित पवार यांनी आपण घेतलेली भूमिका कशी बरोबर आहे, हेच या पत्रातून मांडले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या