Saturday, May 4, 2024
Homeनाशिकअखेर ठरलं! साहित्य संमेलन नाशकातच

अखेर ठरलं! साहित्य संमेलन नाशकातच

नाशिक | Nashik

कला आणि साहित्य क्षेत्रासाठी अति महत्त्वाचे समजले जाणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक शहरात हाेण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीच्या दौऱ्याची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर येत्या आठ जानेवारीला संमेलनाच्या स्थळाची घोषणा करण्यात येणार आहे. नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळू शकताे असेही बाेलले जात आहे.

संमेलनाच्या नियोजनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक आैरंगाबाद मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. साहित्य संमेलनासाठी पुणे, अंमळनेर, नाशिक, सेलू येथील संस्थेची निमंत्रणे आली. होती.

नाशिक येथील दोन संस्थांनी निमंत्रणाचे प्रस्ताव पाठवले होते. त्यात सार्वजनिक वाचनालय, नाशिक आणि लोकहितवादी मंडळ यांचे प्रस्ताव होते. या प्रस्तावांवर बैठकीत चर्चा होऊन साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची निवड करण्यात आली.

या समितीत अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते आणि प्रकाश पायगुडे यांचा समावेश आहे. ही समिती नाशिक येथे सात जानेवारीला स्थळ निवडीसाठी भेट देणार आहे. तर आठ जानेवारीला स्थळ निवड समितीची औरंगाबादेत बैठक होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या