Saturday, May 4, 2024
Homeनगरअगस्ती कारखाना निवडणूक : मतदारांमध्ये उत्साह, २ वाजेपर्यंत 'इतके' मतदान

अगस्ती कारखाना निवडणूक : मतदारांमध्ये उत्साह, २ वाजेपर्यंत ‘इतके’ मतदान

अकोले | प्रतिनिधी

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत मोठा उत्साह दिसत असून दुपारी २ वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाले आहे. अजून तीन तास शिल्लक आहे, त्यामुळे यावेळी विक्रमी मतदान होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ व आमदार डॉ किरण लहामटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर, जिपचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, माकप नेते डॉ अजित नवले, कम्युनिस्ट नेते कॉ कारभारी उगले, आर पी आय चे नेते विजयराव वाकचौरे, आदींच्या नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळात सरळ चुरशीची लढत होत आहे. या निवडणुकीसाठी 8342 सभासद मतदार व 50 उत्पादक व बिगर उत्पादक पणन संस्था प्रतिनिधी असे एकुण 8392 मतदार आहेत.

Madhuri Dixit : धकधक गर्लच्या घायाळ करणाऱ्या अदा बघून चुकतील ह्रदयाचे ठोके!

आज रविवारी सकाळी 8 वाजता 23 मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीला मतदानाचा वेग फार नव्हता,पहिल्या दोन तासात 18 टक्के मतदान झाले त्यानंतर मतदानाचा वेग वाढत गेला. दुपारी 12 वाजेपर्यंत 45 इतके मतदान झाले तर दुपारी 2 वाजेपर्यंत 70 टक्के मतदान झाले. एकूण 8392 मतदारां पैकी 5927 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांनी राजूर येथे तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांनी शेंडी येथे, माकपचे नेते डॉ अजित नवले,काँग्रेसचे नेते मधुकरराव नवले, यांचेसह जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा कारखान्याचे उपाध्यक्ष सिताराम गायकर यांनी अगस्ति हायस्कूल अकोले येथे सपत्निक मतदानाचा हक्क बजावला.

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरच्या मिनी ड्रेसवर बोल्ड पोझ, सौंदर्य बघून चाहतेही झाले दंग

सर्वच मतदान केंद्रांवर उमेदवार व नेते मंडळी मतदारांना मतदानासाठी हात जोडत होते. अनेक मतदान केंद्रांवर” क्रॉस व्होटिंग”ची चर्चा दबक्या आवाजात सुरू असल्याचे ऐकू येत होते. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

दुपारी 2 वाजेपर्यंत 23 मतदान केंद्रांवर झालेले मतदान पुढील प्रमाणे…

- Advertisment -

ताज्या बातम्या