अकोले । प्रतिनीधी
अकोले विधानसभा मतदार संघातून नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यामुळे अकोलेत चुरशीची बहुरंगी लढत होणार आहे.
महायुती आणि महविकास आघाडी या दोन्हीही आघाड्यांमध्ये बंडखोरी झाली असून भाजपचे माजी आमदार वैभव पिचड, शिवसेना बंडखोर मधुकर तळपाडे व माजी उपसभापती मारुती मेंगाळ या प्रमुख उमेदवारांनी आपले अपक्ष अर्ज कायम ठेवले आहे.
अकोले विधानसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत एक अर्ज अवैध ठरला होता. त्यामुळे 12 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते.त्यातील रामदास दत्तू लोटे व शकुंतला भाऊसाहेब दराडे,गणेश काशिनाथ मधे या तीन अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज आज मागे घेतले.
आता पुढील प्रमाणे नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
डॉ.किरण यमाजी लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), अमित अशोक भांगरे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष), पांडुरंग नानासाहेब पथवे (राष्ट्रीय समाज पक्ष), भिवा रामा घाणे (जय हिंद जय भारत राष्ट्रीय पार्टी), माजी आमदार वैभव मधुकरराव पिचड, शिवसेना नेते मधुकर शंकर तळपाडे, पं.स.चे माजी उपसभापती मारुती देवराम मेंगाळ, विलास धोंडीबा घोडे, किसन विष्णू पथवे .
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनुपसिंह यादव तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे हे काम पाहत आहेत.