Thursday, November 21, 2024
Homeनगरअकोलेच्या भाजप नगरसेवकावर पोक्सोचा गुन्हा दाखल

अकोलेच्या भाजप नगरसेवकावर पोक्सोचा गुन्हा दाखल

अकोले |प्रतिनिधी| Akole

येथील नगरपंचायतचे भाजप नगरसेवक हितेश रामकृष्ण कुंभार यांनी खासगी शिकवणी क्लासवरून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून जवळ ओढून तू मला आवडतेस म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी त्यांच्यावर पोक्सोचा अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत 12 वर्षे 1 महिना वयाच्या अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. सदर पीडित मुलगी शहरातील एका खासगी क्लासला जात असते. 15 दिवसांपासून क्लास सुटल्यानंतर घरी जात असताना तिच्याकडे हितेश कुंभार एकटक पाहून बोलण्याचा प्रयत्न करायचा. तसेच ती घरी जात असताना तिचा पाठलाग करायचा. 30 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ती क्लास सुटल्यानंतर घरी जात असताना कुंभार यांनी फिर्यादीचा हात पकडून जवळ ओढले व तू मला आवडतेस असे म्हणून अंगावर हात फिरवून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

यावरून अकोले पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 75(1), 78(1) व पोक्सो कायदा कलम 11(4), 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खांडबहाले हे करत आहे.

नगरसेवक हितेश कुंभार यांच्यावर अकोले पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याशी भाजप पक्ष किंवा अकोले नगरपंचायतीचा कोणताही संबंध नाही. हा त्यांचा व्यक्तिगत वाद आहे, तरीही पक्षाच्यावतीने आम्ही या संदर्भात माहिती घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष यशवंत आभाळे यांनी दिली.
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या